Home /News /national /

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिले जाईल का? शरद पवारांनी दिले स्पष्ट उत्तर

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिले जाईल का? शरद पवारांनी दिले स्पष्ट उत्तर

पण मला पूर्ण विश्वास आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार चालवणार आहोत. कोणतेही बदल करण्याची गरज नाही,

पण मला पूर्ण विश्वास आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार चालवणार आहोत. कोणतेही बदल करण्याची गरज नाही,

पण मला पूर्ण विश्वास आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार चालवणार आहोत. कोणतेही बदल करण्याची गरज नाही,

    नवी दिल्ली, 21 जून : शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 29 आमदारांना घेऊन बंड पुकारले आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू आहे. पण त्यांना मुख्यमंत्रिपद द्यावं की नाही द्यावं हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे.  त्यातून कोणता कोणता तरी मार्ग निघणार आहे, अशी सूचक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. एकनाथ शिंदे यांनी 29 आमदारांना घेऊन बंड पुकारल्यामुळे खळबळ उडाली आहे. नवी दिल्लीत शरद पवार (Sharad pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे. 'मला तिथली जी परिस्थिती दिसत आहे, त्यातून कोणता कोणता तरी मार्ग निघणार आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे अशी चर्चा मी माध्यमातून ऐकतोय, पण पक्षात जी सांभाळण्याची जबाबदारी आहे ती पक्षप्रमुखांवर आहे. जर त्यांच्या पक्षामध्ये कुणाला काही जबाबदारी द्यायची आहे, तो शिवसेनेचा निर्णय असणार आहे. त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यांनी जर पक्ष म्हणून काही निर्णय घेतला तर आम्ही त्या निर्णयाला पाठिंबा देऊ' असं पवारांनी स्पष्ट केलं. पण मला पूर्ण विश्वास आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार चालवणार आहोत.  कोणतेही बदल करण्याची गरज नाही, असंही पवारांनी स्पष्ट केलं. 'महाराष्ट्रामध्ये जे काही सुरू आहे, मागील अडीच वर्षांपासून दोन वेळा झाले आहे. उद्धव ठाकरे यांचं सरकार बनलं होतं. आमचे आमदार उचलून हरियाणा आणि गुरगावमध्ये आणून ठेवले होते. पण तिथूनही ते आमदार परत आले होते. त्यानंतर सरकार स्थापनं झालं, असं पवारांनी सांगितलं. 'विधान परिषदेत राष्ट्रवादीचे दोन उमेदवार होते. त्यांना पूर्णपणे पाठिंबा मिळाला. आमदार विजयी झाले आहे. आमच्या आमदारांनी योग्य भूमिका मांडली आहे.  पण आम्ही अजिबात नाराज नाही. आमचा एक उमेदवार जिंकू शकला नाही. पण, इतर दुसऱ्या पक्षाचा उमेदवार होता, त्यात अपयश आले आहे. त्याला मत मिळू शकले नाही.  मुंबईत जाऊन चर्चा करणार आहे. नेमकं काय घडलं आहे, असंही पवारांनी सांगितलं. अमित शहांना कोण कुठे भेटणार आहे, याबद्दल मी सांगू शकणार नाही. विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस मतदान होत असतं. मागेही अनेक निवडणुकीमध्ये असे प्रकार घडले आहे, त्यामुळे सरकार काही पडले नाही. सरकार हे कायम राहिले आहे, असंही पवारांनी आवर्जुन  सांगितलं. 'या घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे, त्यांची बैठक झाल्यानंतर आमची संध्याकाळी बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा करणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Eknath Shinde, Maharashtra News, Sharad Pawar (Politician), Shiv sena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या