Home /News /national /

स्पाइसजेटची 3 विमान सुरत एअरपोर्टवर दाखल, बंडखोर आमदारांना मध्यरात्रीतूनच एअरलिफ्ट करणार

स्पाइसजेटची 3 विमान सुरत एअरपोर्टवर दाखल, बंडखोर आमदारांना मध्यरात्रीतूनच एअरलिफ्ट करणार

मुंबईतून सुरत आता सुरतहून....? पळवापळवी टाळण्यासाठी आमदारांचं एअरलिफ्ट...

    मुंबई, 21 जून : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 आमदार त्यांच्यासोबत असल्याचा दावा केला आहे. त्याशिवाय गेल्या काही वेळापासून आमदारांला मारहाण करणे, किंवा त्यांचं अपहरण केल्याचाही आरोप केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर बंडखोरी करून सुरतला गेलेल्या आमदारांना एअरलिफ्ट करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. सुरतच्या (Surat) विमानतळावर स्पाइसजेटचं विमान (SpiceJet aircraft at Surat) दाखल झालं असून त्यांना आज रात्रीचं आसामच्या गुवाहाटीला एअरलिफ्ट करण्यात येणार आहे. सुरजच्या विमानतळावर स्पाइसजेटची तीन विमानं दाखल झाली आहे. एकनाथ शिंदे एअरपोर्टवर येऊन गेल्याचंही सांगण्यात आलं आहे. या सर्वासाठी गुजरातच्या भाजप आमदारांकडून मोठी मदत केली जात आहे. त्यांनीच सोय उपलब्ध करून दिल्याचंही सांगितलं जात आहे. बंडखोर आमदारांची पळवापळवी होऊ नये यासाठी त्यांना हलवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय आमदारांचे नातेवाईकही त्यांना भेटायला येऊ शकतात. यासाठी सर्व बंडखोर आमदारांना हलवण्यात येणार आहे. सुरत एअरपोर्टवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवसेनेच्या 5 बंडखोर आमदारांना सूरतमध्ये मारहाण? शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या सूरतच्या एका हॉटेलमध्ये आहेत. हे सर्व आमदार शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातला गेले आहेत. या आमदारांमध्ये नितीन देशमुख यांचादेखील समावेश आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आमदार नितीन देशमुख यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या पाच आमदारांना सूरतमध्ये मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पाचही आमदारांना महाराष्ट्र परत यायचं होतं. त्यातूनच त्यांना मारहाण करण्यात आल्याचा दावा केला जातोय. विशेष म्हणजे या मारहाणीची गंभीर दखल गृह खात्याकडून घेण्यात आली आहे. ज्या आमदारांना मारहाण झाली आहे त्या आमदारांच्या नातेवाईकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी नितीन देशमुख यांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच आणखी दोन आमदारांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Eknath Shinde, Mla, Shivsena, Surat

    पुढील बातम्या