Home /News /national /

Presidential Polls : भाजपकडून एकाच दगडात दोन पक्षी? द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर

Presidential Polls : भाजपकडून एकाच दगडात दोन पक्षी? द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर

Presidential Elections: शरद पवार, गोपाळकृष्ण गांधी आणि फारुख अब्दुल्ला अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर यशवंत सिन्हा यांचे नाव पुढे आले आहे. आता भाजपनेही त्यांचा उमेदवार घोषित केला आहे.

  नवी दिल्ली, 21 जून : महाराष्ट्रात शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं बंडखोरी नाट्य रंगलं असताना तिकडे दिल्लीत राष्ट्रपतीपदासाठी भाजपने उमेदवार घोषित केला आहे. याआधी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह 13 विरोधी पक्षांनी मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा (yashwant sinha) यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Presidential Elections) विरोधी उमेदवार म्हणून नाव देण्यास सहमती दर्शवली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचे उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांची एकमताने निवड करण्यात आल्याचे संयुक्त निवेदनात म्हटले आहे. तर दुसरीकडे भाजपने आज ओडीशाच्या द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ..म्हणून द्रौपदी मुर्मू यांना संधी : जेपी नड्डा भाजप अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले, की आज भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक पंतप्रधानांच्या उपस्थितीत पार पडली. राष्ट्रपती निवडणुकीची अधिसूचना 15 जून रोजी जारी करण्यात आली होती. त्याच वेळी मला आणि राजनाथजींना वेगवेगळ्या पक्षांशी वाटाघाटी करून पुढे जाण्याची जबाबदारी मिळाली. आम्ही सर्वांशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण एकमत होऊ शकले नाही. आज यूपीएने आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या सर्व घटकांशी चर्चा करून आमचा उमेदवार जाहीर केला. आज सुमारे 20 नावांवर चर्चा झाली. अजूनपर्यंत आदिवासी व्यक्ती राष्ट्रपतीपदावर आलेला नाही. त्यामुळे आम्ही द्रौपदी मुर्मू यांनी संधी देत असल्याचे जेपी नड्डा यांनी सांगितले.

  महाराष्ट्रात राजकीय भूकंप, काऊंटडाऊन बिगिन! उद्धव ठाकरे उद्या 1 वाजता घेणार मोठा निर्णय?

  कोण आहेत द्रौपदी मुर्मू? झारखंडच्या नवव्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू (वय 64 वर्षे) या ओडिशातील रायरंगपूरमधून आमदार होत्या. राज्यपाल बनलेल्या त्या पहिले ओडिशा नेत्या आहेत. याआधी 2002 ते 2004 या काळात त्या भाजप-बीजेडी युती सरकारमध्ये मंत्रीही होत्या. देशातील 47 ST राखीव लोकसभेच्या जागा आणि देशातील आदिवासींना संदेश देण्यासाठी द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिसल्याचे यातून दिसून येते. भविष्यात भाजप ओडिशा विस्ताराअंतर्गत मुर्मू यांच्या नावाचा उपयोग पक्षात होऊ शकतो. शिवाय महिला उमेदवार असल्याचे महिला सबलीकरणाचाही संदेश देशात जात आहे. एकंदरीत भाजपने एकाच दगडात दोन पक्षी उडवल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत सिन्हा यांच्या नावावर शिक्कामोर्तब राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी संसद भवनात जमलेल्या विरोधी पक्षनेत्यांनी सिन्हा यांच्या नावावर एकमत केल्याचे सूत्रांनी सांगितले. पवार, गोपाळकृष्ण गांधी आणि फारुख अब्दुल्ला अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाद झाल्यानंतर सिन्हा यांचे नाव पुढे आले. यशवंत सिन्हा हे दोनदा केंद्रीय अर्थमंत्री राहिले आहेत. ते पहिल्यांदा 1990 मध्ये चंद्रशेखर सरकारमध्ये आणि नंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अर्थमंत्री होते. वाजपेयी सरकारमध्ये ते परराष्ट्र मंत्रीही होते. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी संयुक्त विरोधी पक्षाचे निवेदन वाचून दाखविताना सांगितले की, मोदी सरकारने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत एकमत निर्माण करण्यासाठी कोणतेही गंभीर प्रयत्न केले नाहीत याची आम्हाला खेद आहे.
  Published by:Rahul Punde
  First published:

  पुढील बातम्या