जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महाराष्ट्रात राजकीय भूकंप, काँग्रेस अलर्ट, 'शिंदे'नी धक्का दिलेल्या नेत्यालाच डॅमेज कंट्रोलची जबाबदारी!

महाराष्ट्रात राजकीय भूकंप, काँग्रेस अलर्ट, 'शिंदे'नी धक्का दिलेल्या नेत्यालाच डॅमेज कंट्रोलची जबाबदारी!

महाराष्ट्रात राजकीय भूकंप, काँग्रेस अलर्ट, 'शिंदे'नी धक्का दिलेल्या नेत्यालाच डॅमेज कंट्रोलची जबाबदारी!

काल झालेल्या विधान परिषदेच्या निकालानंतर (Vidhan Parishad Elections) राज्यात राजकीय भूकंप आला आहे. शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाविरोधात बंड केलं आहे. एकीकडे शिवसेनेमध्ये बंड झालेलं असतानाच आता काँग्रेसही अलर्ट मोडवर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 जून : काल झालेल्या विधान परिषदेच्या निकालानंतर (Vidhan Parishad Elections) राज्यात राजकीय भूकंप आला आहे. शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाविरोधात बंड केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 29 आमदार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या आमदारांसोबत शिंदे सूरतमध्ये आहेत. शिवसेनेतल्या या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) वर्षा बंगल्यावर एकामागोमाग एक बैठका घेत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळचे असे मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदेंशी बोलण्यासाठी सूरतला गेले आहेत. एकीकडे शिवसेनेमध्ये बंड झालेलं असतानाच आता काँग्रेसही अलर्ट मोडवर आली आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय संकटावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने कमलनाथ (Kamal Nath) यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. महाविकासआघाडीच्या घटकपक्षांसोबत कमलनाथ हे चर्चा करणार आहेत. योगायोगाने कमलनाथ हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना ज्योतिरादित्य शिंदे यांनीच बंड करत भाजपचं कमळ हातात घेतलं. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह आमदार काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं, त्यानंतर पुन्हा एकदा शिवराजसिंग चौहान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते.

News18

काँग्रेसला 10 आमदारांची चिंता दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला. काँग्रेसमध्येच क्रॉस व्होटिंग झाल्यामुळे आणि काही मत फुटल्यामुळे काँग्रेसच्या गोटातही चिंतेचं वातावरण आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली 10 आमदारांसह बाहेर पडण्याचा तयारीत आहेत. विधानपरिषदेत झालेल्या पराभवानंतर विजय वडेट्टीवार आपल्या 10 आमदारांसोबत बाहेर पडणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान काँगेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शिवसेनेपाठेपाठ काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत दुफळी दिसून येत आहे. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडेल का यावर शंका व्यक्त करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात