जाहिरात
मराठी बातम्या / देश / सहाव्या जागेसाठी चुरस वाढली, महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार? गायक मुसेवालाची हत्या TOP बातम्या

सहाव्या जागेसाठी चुरस वाढली, महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार? गायक मुसेवालाची हत्या TOP बातम्या

सहाव्या जागेसाठी चुरस वाढली, महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार? गायक मुसेवालाची हत्या TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 मे : भाजपने (bjp) आता तिसरी जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील (maharashtra) राज्यसभेच्या 6 जागांसाठी आता 7 उमेदवार रिंगणात आहे. काँग्रेस हायकमांडने (Congress High command) आज महाराष्ट्रातील प्रमुख मंत्र्यांची दिल्लीत तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकीत महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसच्या स्थानाविषयी चर्चा होणार आहे. उद्योगपती अविनाश भोसले यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मलिक आणि देशमुख यांच्यावरील कारवाईवरुन भाजपवर टीका केली आहे. राज्यसभेसाठी भाजपची खेळी राज्यसभा निवडणुकीसाठी  ( rajya sabha election 2022) राज्यात आता चुरस आणखी वाढली आहे. शिवसेनेनं (shivsena) दोन उमेदवार मैदानात उतरवले आहे. तर काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादीकडून प्रत्येकी उमेदवार मैदानात आहे. पण, भाजपने (bjp) आता तिसरी जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील (maharashtra) राज्यसभेच्या 6 जागांसाठी आता 7 उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे. सविस्तर वाचण्याठी क्लिक करा. उद्योगपती अविनाश भोसले यांना कोर्टात हजर करणार अटकेत असलेले उद्योगपती अविनाश भोसले यांना आज मुंबई सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीमुळे ठाकरे सरकार खरंच अडचणीत येणार? काँग्रेस हायकमांडने (Congress High command) आज महाराष्ट्रातील प्रमुख मंत्र्यांची दिल्लीत तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकीत महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसच्या स्थानाविषयी चर्चा होणार आहे. महाविकास आघडीमध्ये काँग्रेस राहणार की जाणार? यासाठी दिल्लीत फैसला होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या वृत्तावर शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचण्याठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) भूकंप येण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) अडचणीत येणार असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महाविकास आघडीमध्ये काँग्रेस (Congress) राहणार की जाणार? यासाठी दिल्लीत फैसला होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी ‘न्यूज 18 लोकमत’ला दिली आहे. सविस्तर वाचण्याठी क्लिक करा. भाजपकडून राज्यसभेसाठी यादी जाहीर, अनिल बोंडेंना लॉटरी राज्यसभा निवडणुकीसाठी ( rajya sabha election 2022) भाजपकडून अखेर आपले पत्ते उघडण्यात आले आहे. भाजपकडून  माजी रेल्वे मंत्री पियुष गोयल ( Piyush Goyal) आणि डॉ. अनिल बोंडे (anil bonde) यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडे तिसऱ्या जागेसाठी उमेदवार देणार अशी चर्चा होती, मात्र, तिसऱ्या जागेसाठी अजूनही सस्पेन्स कायम आहे. सविस्तर वाचण्याठी क्लिक करा. काँग्रेसकडून राज्यसभेसाठी महाराष्ट्रामधून उमेदवाराचे नाव जाहीर राज्यसभा निवडणुकीसाठी ( rajya sabha election 2022) भाजपने तीन उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आता काँग्रेसकडून महाराष्ट्रातून उमेदवाराचे नाव जाहीर झाले आहे. महाराष्ट्रमधून राज्यसभेसाठी इमरान प्रतापगढी (Imran Pratapgadhi ) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, राज्यातून कुणालाही संधी न दिल्यामुळे महाराष्ट्रातील नेते नाराज असल्याचे समोर आले आहे. सविस्तर वाचण्याठी क्लिक करा. शिवरायांच्या ‘स्वराज्या’साठी छत्रपती घराण्याचे दोन भाऊ एकत्र येणार? काल छत्रपती घराण्याशी संबंधित एक चांगली आणि थोडी वेगळी बातमी समोर आली आहे. छत्रपती घराण्याचे सातारा गादीचे वंशच शिवेंद्रराजे भोसले आणि कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे यांची भेट झाली आहे. त्यांच्या भेटीचा फोटो स्वत: संभाजीराजे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. सविस्तर वाचण्याठी क्लिक करा. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावर केंद्र सरकारचा अन्याय : सुप्रिया सुळे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद्र इब्राहिम याच्याशी संबंधित पैशांच्या अफरातफरच्या आरोपांप्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक जेलमध्ये आहेत. तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखदेखील जेलमध्ये आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा ईडी आणि सीबीआयने त्यांच्याविरोधात केलेल्या कारवाईवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर टीका केली जाते. आतादेखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मलिक आणि देशमुख यांच्यावरील कारवाईवरुन भाजपवर टीका केली आहे. सविस्तर वाचण्याठी क्लिक करा. पंजाबी वादग्रस्त गायक आणि राजकारणी सिद्धू मूसेवालाची हत्या सिद्धू मूसेवाला यांनी गेल्या वर्षी पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 29 वर्षीय पंजाबी कलाकाराने मानसा मतदारसंघातून 2022 ची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा आम आदमी पार्टीचे डॉ. विजय सिंगला यांच्याकडून पराभव झाला होता. त्याची आज हत्या करण्यात आली. सविस्तर वाचण्याठी क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात