जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / काल सुरक्षा हटवली; आज प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या

काल सुरक्षा हटवली; आज प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या

काल सुरक्षा हटवली; आज प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या

पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला यांची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 मे- Punjabi Singer Sidhu Moosewala Shot Dead : पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला  (punjabi singer sidhu moosewala ) यांची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मानसा येथे सिद्धू यांच्यावर गोळी झाडण्यात आली असून या घटनेत सिद्धुचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अज्ञातांनी केलेल्या या हल्ल्यात इतर दोघे जखमी झाले आहेत. पंजाबमधील भगवंत मान सरकारने ४२४ महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. सुरक्षा काढून घेतलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये ज्येष्ठ नेते चरणजीत सिंह ढिल्लो, बाबा लाखा सिंह, अकाली दलाचे नेते गनीव कौर मजीठिया, काँग्रेस नेते परगत सिंह, आप आमदार मदन लाल बग्गा यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सुरक्षा काढून घेतलेल्या या महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये सिद्धू मुसेवाला यांचा सामावेश होता. सुरक्षा काढून घेतल्याचा ठीक एका दिवसानंतर ही घटना घडल्याचे समोर आलं आहे. वाचा- ‘शक्य आहे तुम्ही जे ठरवाल ते शक्य..’ ह्रता दुर्गुळेची नवीन पोस्ट नेमकी कशाबद्दल? मिळालेल्या माहितीनुसार, गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला आपल्या मित्रांसोबत मानसा येथे त्यांच्या घरी जात होते. यावेळी प्रवासादरम्यान त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. अज्ञातांनी केलेल्या या हल्ल्यात त्यांच्या मृत्यू झाला आहे. यासोबत त्यांचे दोन मित्र देखील जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. वाचा- प्राजक्ता माळीनं असा घालवला आजी- आजोबांसोबत दिवस, फोटो शेअर करत म्हणाली.. सिद्धू मुसेवाला यांनी 2022 साली काँग्रेसच्या तिकिटावर पंजाब विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना आम आदमी पक्षाचे डॉ. विजय सिंग यांच्याकडून पराभाव स्वीकारावा लागला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात