जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावर केंद्र सरकारचा अन्याय : सुप्रिया सुळे

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावर केंद्र सरकारचा अन्याय : सुप्रिया सुळे

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावर केंद्र सरकारचा अन्याय : सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईवरुन भाजपवर टीका केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

उस्मानाबाद, 29 मे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद्र इब्राहिम याच्याशी संबंधित पैशांच्या अफरातफरच्या आरोपांप्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक जेलमध्ये आहेत. तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखदेखील जेलमध्ये आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा ईडी आणि सीबीआयने त्यांच्याविरोधात केलेल्या कारवाईवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर टीका केली जाते. आतादेखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मलिक आणि देशमुख यांच्यावरील कारवाईवरुन भाजपवर टीका केली आहे. “राज्य सरकार विरोधात सध्या द्वेष आणि बदला घेण्याचे काम सुरु आहे. केंद्र सरकार विरोधात कुणी बोललं तर त्या व्यक्तीविरोधात केस करणे, अटक करणे असे उद्योग सुरु होतात. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अन्याय केला जातोय. ज्याच्यावर आरोप होत आहेत त्या व्यक्तीला माफीचा साक्षीदार बनवले जात आहे. आणि आरोप करणारा फरार आहे”, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली. ( …म्हणून त्यांनी मला मारलं, आमदार राऊतांकडून कानशिलात खाणारा कार्यकर्ताच आला समोर, VIDEO ) “ईडी, सीबीआय स्वायत्त संस्था तर कारवाई होण्याअगोदर भाजपच्या नेत्यांना कारवाईची माहिती कशी होते? आम्ही केंद्रीय मंत्री अमित शहा यांना याबाबत विचारणार असून पारदर्शक सरकार असताना असे होतेच कसे?”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ‘चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरील वादावर पडदा टाका’ दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागितली आहे. त्यांनी राज्य महिला आयोगाला पत्र पाठवून याबाबत माफी मागितली आहे. त्यांच्या या माफीनाम्याबद्दल सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी वादावर पडदा पाडण्याचं आवाहन केलं. “चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर मी सुरवातीपासून काहीच बोलले नाही. आता त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत माफी मागितली असेल तर माझी मीडियाला आणि सगळ्यांना विनंती आहे की या वादावर आता पडदा टाका”, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात