मुंबई, 29 मे : राज्यसभा निवडणुकीसाठी ( rajya sabha election 2022) राज्यात आता चुरस आणखी वाढली आहे. शिवसेनेनं (shivsena) दोन उमेदवार मैदानात उतरवले आहे. तर काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादीकडून प्रत्येकी उमेदवार मैदानात आहे. पण, भाजपने (bjp) आता तिसरी जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील (maharashtra) राज्यसभेच्या 6 जागांसाठी आता 7 उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे. राज्यसभा निवडणूक आता बिनविरोध होणार की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून एकूण 7 उमेदवार रिंगणार उतरले आहे. ३ जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख त्या दिवशी राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार की प्रत्यक्ष लढत होणार हे स्पष्ट होणार आहे. राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना विरुद्ध भाजप अशी प्रतिष्ठेची लढत होणार आहे. भाजपने तिसरा अतिरीक्त उमेदवार रिंगणात उतरवला आहे. तोही कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांना. त्यामुळे शिवसेनेचे दुसरे उमेदवार कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यात राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आता प्रत्यक्ष मतदान होऊन निवडणुकीत दोघांपैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. राज्यसभेच्या ६ जागापैकी २ जागा निवडून आणण्याची मतदान क्षमता भाजपकडे आहे. ( यंदाच्या साखर हंगामात एफआरपीमधून शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम डोळे फिरवणारी ) मात्र भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडीक यांना निवडुन आणण्यासाठी भाजपला 18 अतिरीक्त मतांची बेगमी करावी लागणार आहे. त्यासाठी अपक्ष आणि इतर पक्षांतील आमदारांची फोडा फोडी करण्यासाठी घोडाबाजार होण्याची शक्यता नाकारत येत नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्ष निवडणुकीची वेळ आल्यास आवाजी पद्धतीने हात वर करून मतदान होणार आहे. त्यामुळे भाजपला आमदाराचा घोडेबाजार करता येणार नाही. पण भाजपने तिसरा उमेदार रिंगणात उतरवला आहे मग निश्चितच त्यांच्या विजयाचेही गणित सोडवण्यासाठी रणनिती आखली असणार आहे. ( काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीमुळे सरकार खरंच अडचणीत येणार? एकनाथ शिंदे म्हणतात… ) आता भाजपच्या या आक्रमक रणनितीला शिवसेना त्यांच्या दूसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी काय रणनिती आखणार आणि त्याची अंमलबजावणी कशी करणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय. महाविकास आघाडीकडे सहावा उमेदवार जिंकून आणण्यासाठी मतांची गोळाबेरीज आहे. मात्र भाजपने फोडा फोडीची राजकारण केलं तर मग शिवसेनेच्या दुसरा उमेदवार अडचणीत येऊ शकतो. येत्या ३ जून रोजी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. तो पर्यंत ७ उमेदवारांपैकी कुणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात असल्यामुळे प्रत्यक्ष मतदानाची वेळ येणार आहे. तशी वेळ आली तर महाविकास आघाडी सरकारची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यामुळे येत्या ३ जून रोजी महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार की प्रत्यक्ष मतदान होऊन लढत होणार याकडे आता राज्याचेच नाहीतर दिल्लीचेही लक्ष लागलंय. राज्यसभा निवडणुकीचा रणसंग्राम 1) राज्यसभेच्या 57 जागांच्या सदस्यांचा कार्यकाळ 4 जुलै रोजी संपत आहे. 2) केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणुकीची घोषणा केली असून, त्यासाठी 24 ते 31 मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. 3) अशा स्थितीत उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांची छाननी 1 जूनला होणार आहे, तर 3 जूनपर्यंत नावे मागे घेता येणार आहेत. 4) राज्यसभेसाठी 10 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत विधान भवनात मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजेपासून मतमोजणी सुरू होईल. 5) येत्या 3 जून रोजी राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार की प्रत्यक्ष मतदान होऊन लढत होणार हे स्पष्ट होईल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.