जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार? ठाकरे सरकार अडचणीत येण्याची शक्यता

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार? ठाकरे सरकार अडचणीत येण्याची शक्यता

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार? ठाकरे सरकार अडचणीत येण्याची शक्यता

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडी सरकार अडचणीत येणार असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 मे : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) भूकंप येण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) अडचणीत येणार असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महाविकास आघडीमध्ये काँग्रेस (Congress) राहणार की जाणार? यासाठी उद्या दिल्लीत फैसला होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी ‘न्यूज 18 लोकमत’ला दिली आहे. काँग्रेस हायकमांडने (Congress High command) उद्या महाराष्ट्रातील प्रमुख मंत्र्यांची दिल्लीत तातडीची बैठक बोलवली आहे. राज्यात सरकारमध्ये असूनही काँग्रेसला दुय्यम वागणूक मिळत आहे, असा आरोप काही काँग्रेस मंत्र्यांचा आहे. काँग्रेसच्या विषयांबाबत दोन्ही मित्र पक्षांकडून अपेक्षित साथ मिळालेली नाही, अशी महाराष्ट्रातील काँग्रेस मंत्र्यांची भावना आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत कोर्ट लढाईत काँग्रेस एकाकी पडली. राष्ट्रवादीने काँग्रेसची कोंडी केली. काँग्रेसचे नगरसेवक फोडले. आमदार निधीमध्ये भेदभाव केला, असा काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे. या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेत्यांची नाराजी टोकाला पोहोचली आहे. त्यामुळेच महाविकास आघडीमध्ये काँग्रेसचे स्थान यावर उद्या दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे. विशेष म्हणजे या बैठकीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बोलावण्यात आलेलं नाही, अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिवसेना खासदाराचीही नाराजी, महाविकास आघाडीत खरंच धुसफूस? महाविकास आघाडीत सध्याच्या घडीला खरंच धुसफूस आहे की काय, असं चित्र निर्माण झालं आहे. कारण शिवसेनेचे दिग्गज नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकतंच एक मोठं विधान केलं होतं. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्रिसूत्री कार्यक्रम पाळला जात नाही. निधी वाटपाबाबत ठरलेला फॉर्म्युला वापरला जात नाही. आपण याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार, असं ते म्हणाले होते. त्यानंतर आता काँग्रेसबाबत ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत खरंच बिघाडी आहे की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे. ( शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपकडून महाडिक मैदानात, उद्या भरणार अर्ज? ) राज्यसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारीबाबत हायकमांडने घेतलेल्या निर्णयावर काँग्रसचे महाराष्ट्रातील नेते नाराज दरम्यान, आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या ( rajya sabha election 2022) पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना (shivsena) आणि छत्रपती संभाजीराजे (sambhajiraje) यांच्यात संघर्ष पाहण्यास मिळाला. पण, आता काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून राज्याबाहेरील व्यक्तीला संधी दिली जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांनी (Maharashtra congress) हायकमांडच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्रातून इमरान प्रतापगढी यांचं नाव निश्चित झालं आहे. तसंच बिहारमधून कन्हैया कुमार, कर्नाटकमधून बी.व्ही. श्रीनिवास यांच्या नावाची चर्चा आहे. या तिन्ही नेत्यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस हायकमांड उत्सुक आहे. पण, राज्यातील अनेक जण इच्छुक असताना बाहेरील नेत्याला संधी देत असल्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस नेते नाराज असल्याचे समोर आले आहे. इतर राज्यातील उमेदवार असल्यास क्रॉस व्होट करू, असा निर्धार आता महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस एक जागा जिंकू शकते, भाजप 2 आणि राष्ट्रवादी एक जागा जिंकू शकते. एक जागा सुरक्षितपणे जिंकण्यासाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अतिरिक्त मतांच्या जोरावर आणखी एका जागेवर काँग्रेस लक्ष ठेवून आहे. काँग्रेस पक्षाकडून इमरान प्रतापगढी यांचं नाव निश्चित झालं आहे. महाराष्ट्रमधून राज्यसभासाठी इमरान प्रतापगढी नाव निश्चित झाल्याची विश्वासनिय सूत्रांची माहिती आहे. अल्पसंख्याकाला महाराष्ट्रामधून राज्यसभा उमेदवारी देण्यासाठी प्रियंका गांधी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. इमरान प्रतापगढी हे काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात