मुंबई, 29 मे : राज्यसभा निवडणुकीसाठी ( rajya sabha election 2022) भाजपने तीन उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आता काँग्रेसकडून महाराष्ट्रातून उमेदवाराचे नाव जाहीर झाले आहे. महाराष्ट्रमधून राज्यसभेसाठी इमरान प्रतापगढी (Imran Pratapgadhi ) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, राज्यातून कुणालाही संधी न दिल्यामुळे महाराष्ट्रातील नेते नाराज असल्याचे समोर आले आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्रातून इमरान प्रतापगढी यांचं नाव निश्चित केलं आहे. त्यांच्या नावाची घोषणा ही करण्यात आली आहे. महाराष्ट्रमधून राज्यसभेसाठी इमरान प्रतापगढी यांना पाठवण्यात आले आहे. इमरान प्रतापगढी हे काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आहेत. त्यांचं नाव हे प्रियंका गांधी यांनीच पुढे केलं असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच बिहारमधून कन्हैया कुमार, कर्नाटकमधून बी.व्ही. श्रीनिवास यांच्या नावाची चर्चा आहे. या तिन्ही नेत्यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस हायकमांड उत्सुक आहे. पण, राज्यातील अनेक जण इच्छुक असताना बाहेरील नेत्याला संधी देत असल्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस नेते नाराज असल्याचे समोर आले आहे. इतर राज्यातील उमेदवार असल्यास क्रॉस व्होट करू, असा निर्धार आता महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस एक जागा जिंकू शकते, भाजप 2 आणि राष्ट्रवादी एक जागा जिंकू शकते. एक जागा सुरक्षितपणे जिंकण्यासाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अतिरिक्त मतांच्या जोरावर आणखी एका जागेवर काँग्रेस लक्ष ठेवून आहे. पण, काँग्रेसकडून आता इमरान प्रतापगढी यांची घोषणा केली आहे. दरम्यान, शिवसेना पक्षाची नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडावी आमची हीच भूमिका आहे. किमान समान कार्यक्रम अंतर्गत सरकारमधील सहकारी पक्षाला योग्य वाटा मिळाला पाहिजे. उद्या सांयकाळी 5 वाजता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सोबत दिल्लीत आमची बैठक आहे. सोनिया गांधी यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची भूमिका विषयी तक्रार केली होती यावर ही चर्चा करणार आहे. राज्यसभा उमेदवारवर चर्चा करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.