Home /News /mumbai /

शिवसेनेनं काँग्रेसला फसवलं! फडणवीस-राऊत भेटीनंतर काँग्रेस नेत्याचा निशाणा

शिवसेनेनं काँग्रेसला फसवलं! फडणवीस-राऊत भेटीनंतर काँग्रेस नेत्याचा निशाणा

ही भेट म्हणजे शिवसेनेचा राजकीय व्याभिचार असल्याचं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.

    मुंबई, 27 सप्टेंबर: शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल दुपारी महाराष्ट्राचे (Maharashtra) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. मात्र, फडवीस यांची राऊत यांनी अशा पद्धतीनं भेट घेणं हे काँग्रेसला (Congress) खटकलं आहे. हेही वाचा...खळबळजनक! कोरोनाच्या धास्तीनं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची औरंगाबादेत आत्महत्या काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी या भेटीवरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ही भेट म्हणजे शिवसेनेचा राजकीय व्याभिचार असल्याचं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर शिवसेना ही काँग्रेसची फसवणूक करत आहे, असा गंभीर आरोप देखील निरुपम यांनी केला आहे. संजय निरुपम यांनी सांगितलं की, 'केंद्र सरकारनं मांडलेल्या कृषी विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं कडाडून विरोध केला. मात्र, शिवसेना पक्ष प्रमुख आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी कृषी विधेयकाला पाठिंबा दिला. शिवसेनाची भूमिका कायम दिशाभूल करणारी आहे. काँग्रेसने आपला विचारधारा, धर्म, व्यवहार सर्वकाही सोडून सत्ता स्थापनेत शिवसेनेला सहकार्य केले. मात्र, हिच शिवसेना आता काँग्रेसची फसवणूक करते आहे. ही भूख अनेकांना संपवते... संजय निरुपम यांनी ट्विटरवरून संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची प्रचंड भूक लागली असून ही भूख अनेकांना संपवते. ही दुर्भावना नाही तर वास्तव आहे, अशा शब्दांत निरुपम यांनी घणाघात केला आहे. शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्यात बैठक दरम्यान, संजय राऊत आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर महाविकास आघाडीत घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक संपली आहे. शरद पवार यांनी तातडीने बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर ही बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सुद्धा उपस्थितीत होते. तिन्ही पक्षांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली होती. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जवळपास 45 मिनिटं चर्चा झाली. या बैठकीविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नाही. पण कालच भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आहे. काल या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर राज्यात पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपात जवळीक निर्माण होतेय का याची चर्चा सुरू झाली आहे. फडणवीस आणि राऊत या दोघांची भेट फक्त दैनिक सामनात फडणवीसांच्या मुलाखतीबद्दल होती, असं स्पष्टीकरण दिले आहे. मात्रस गेल्या वर्षी झालेल्या अनाकलनीय राजकीय उलथापालथींमुळे प्रत्येक राजकीय हालचाल संशयाच्या नजरेनं पाहिल्या जात आहे. आणि आज लगेच पवार- ठाकरे भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कालच्या भेटीमुळे अस्वस्थता आहे की काय याची चर्चा सुरू झाली आहे. हेही वाचा..'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत फडणवीसांच्या भेटीनंतर काय म्हणाले राऊत? त्याआधी आज सकाळीच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन या भेटीबद्दल खुलासा केला होता. यावेळी ते म्हणाले की, 'देवेंद्र फडणवीस यांची भेट ही गुप्तपणे मुळीच नव्हती. 'सामना'च्या मुलाखतीसाठी त्यांची भेट घेतली होती. गप्पा मारल्या आणि एकत्र जेवण केले. मुळात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत कुणीही कुणाचे शत्रू नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे काही आमचे कायमचे शत्रू नाही. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे. उद्धव ठाकरे हे सुद्धा त्यांना आपला नेता मानतात आणि मी सुद्धा मानतो' असं राऊत म्हणाले.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Congress, Devendra Fadnavis, NCP, Sanjay nirupam, Sanjay raut, Shiv sena

    पुढील बातम्या