Home /News /sport /

'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाकिस्तान सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत

'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाकिस्तान सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत

India-Pakistan Cricket: भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या 13 वर्षात एकही टेस्ट सीरिज झाली नाही आहे. 2007 मध्ये दोन्ही टीममध्ये शेवटची सीरिज झाली होती.

    नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पाहताना जो आनंद मिळतो तो कशामध्ये मोजता येणारा नसतो, असं वाक्य तुम्ही अनेकदा क्रिकेट चाहत्यांकडून ऐकलं असेल. पण पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएल खेळता येत नसल्यामुळे अनेक चाहते नाराज देखील आहेत. पाकिस्तानी क्रिकेटर्सना आयपीएल खेळता येत नाही, त्यामुळे पाकिस्तानी टीममध्ये देखील नाराजी असते. याबाबतच बोलताना पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू क्रिकेटर शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने देखील खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्याने असे म्हटले आहे की, जोपर्यंत भारतात नरेंद्र मोदींचे सरकार आहे (PM Modi Government) तोपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये सीरिज होणार नाही. त्याचप्रमाणे तो असं म्हणाला की, पाकिस्तानी क्रिकेटर आयपीएल (IPL 2020) मिस करत आहेत. त्याच्या मते या सामन्यांमुळे युवा खेळाडूंना लीगमध्ये खेळण्याचा विशेष फायदा झाला असता. (हे वाचा-अशी तयार करू शकता KKR vs SRH ची Dream 11 Team, पाहा संपूर्ण यादी) भारत-पाकिस्तानमध्ये सीरिज होत नसल्याच्या मुद्द्यावरून आफ्रिदीने मोदी सरकारवर टीका केली आहे. अरब न्यूजशी केलेल्या संभाषणात त्याने याबाबत भाष्य केले. त्याच्या मते, 'पाकिस्तान सरकार भारताशी क्रिकेट खेळण्यास तयार आहे. मात्र भारतामध्ये असलेल्या सरकारमुळे दोन्ही देशात क्रिकेटची कोणतीही आशा नाही आहे. जोपर्यंत मोदी सरकार सत्तेत आहे तोपर्यत भारत-पाकिस्तानमध्ये कोणतीही सीरिज होऊ शकत नाही.' शाहिद आफ्रिदीने असे म्हटले की सर्वात श्रीमंत लीग असणाऱ्या आयपीएलमध्ये खेळायला मिळत नसल्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटर्सचं नुकसान होत आहे. भारत-पाकिस्तानमध्ये 13 वर्ष नाही झाली आहे टेस्ट सीरिज भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या 13 वर्षात एकही टेस्ट सीरिज झाली नाही आहे. 2007 मध्ये दोन्ही टीममध्ये शेवटची कसोटी मालिका झाली होती. तीन टेस्ट मॅचची ही मालिका भारताने 1-0 ने जिंकली होती. त्याचप्रमाणे दोन्ही संघांमध्ये गेल्या 7 वर्षात कोणतीही एकदिवसीय मालिका आयोजित केली गेली नाही आहे. 2013 मध्ये पाकिस्तानने भारत दौरा केला होता. पाकिस्तानने त्या सीरिजमध्ये 2-1 ने विजय मिळवला होता. (हे वाचा-'मोदीजी आता तुम्हीच समजवा', धोनीच्या निर्णयावर सेहवागनं PMकडे मागितली मदत) पीसीबी चेअरमन एहसान मनी यांनी काही दिवासांपूर्वी असं वक्तव्य केलं होतं की, दोन्ही देशांमध्ये मालिका आयोजित केली जावी याबाबत गेल्या अनेक वर्षात बीसीसीआयशी (BCCI) चर्चा सुरू आहे. टी-20 क्रिकेट किंवा Bilateral सीरिज- दोन्हींसाठी चर्चा सुरू असल्याचंही ते म्हणाले. मात्र अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: BCCI, Cricket, IPL 2020, Pakistan cricketer, Pm modi, PM narendra modi, Shahid Afridi

    पुढील बातम्या