औरंगाबाद, 27 सप्टेंबर: कोरोनाच्या धास्तीने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यानं शासकिय घाटी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रविवारी (आज) सकाळी आठच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. काकासाहेब कणसे असे रुग्णाचे नाव आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस होते.
हेही वाचा...जन्माला येण्याआधीच काळाचा घाला, ट्रकच्या धडकेत गर्भवतीसह 7 जणांचा जागीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील धनगाव येथील काकासाहेब कणसे यांच्यावर 21 सप्टेंबरपासून घाटी रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, 25 सप्टेंबरला त्यांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना आयसीसीयूमध्ये हलवण्यात आलं होतं. मात्र, रविवारी सकाळी डॉक्टरांचा राऊंड सुरू असताना त्यांनी पिण्यासाठी पाणी मागितलं. डॉक्टरांनी त्यांना पाणी दिलं. त्यानंतर त्यांनी शौचास जाण्याचा बहाण्यानं इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. हा प्रकार वॉर्डातील ब्रदरच्या लक्षात आला. त्यानं खिडकीतून डोकाऊन पाहिले असता कणसे खाली पडलेले दिसले. लगेचच त्यांना अतिविशेषोपचापर इमारतीतील आरएमओ व खालील सुरक्षा रक्षकांना सूचित करण्यात आलं. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी पोलिसांना माहिती देण्यात आली.
दरम्यान काकासाहेब कणसे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, कोरोनाच्या धास्तीनं त्यांनी आत्महत्येसारख टोकाचं पाऊल उचललं असावं, असं बोललं जात आहे. पोलिस नातेवाईकांकडे चौकशी करत आहेत.
देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 59 लाखांहून जास्त...
दुसरीकडे, देशात कोरोनाचे नवीन रुग्ण सप्टेंबर अखेरीला कमी आढळून येत आहेत. 93 ते 97 हजाराच्या आकड्यावरून आता जवळपास 90 च्या अलिकडे आली असल्यानं दिलासा देणारी गोष्ट आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार 24 तासांत 88 हजार 600 नवीन लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 1 हजार 124 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आतापर्यंचा आकडा 59 लाख 92 हजार 533 वर पोहोचला आहे.
सध्या 9 लाख 56 हजार 402 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 49 लाख 41 हजार 628 लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशात 94 हजार 503 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका ब्राझिलच्या तुलनेत भारतात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक वाढत आहेत. अमेरिका पहिल्या तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे.
10 लाखांचा टप्पा ओलांडला....
महाराष्ट्रात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने शनिवारी 10 लाखांचा टप्पा ओलांडला. दिवसभरात 23 हजार 644 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे राज्यभरात आतापर्यंत 10 लाख 16 हजार 450 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
हेही वाचा...पॉझिटिव्ह बातमी! Coronavirus शी लढणाऱ्या प्रभावी अँटिबॉडी सापडल्या
राज्यात आज 20 हजार 419 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 430 जणांचा मृत्यू झाला. राज्यातल्या कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ही 13 लाख 21 हजार 376 एवढी झाली आहे. राज्यात सध्या 2 लाख 69 हजार 119 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.