Home /News /mumbai /

विधान परिषदेसाठी सेनेची मोर्चेबांधणी, उद्धव ठाकरेंसह 'हे' नाव निश्चित

विधान परिषदेसाठी सेनेची मोर्चेबांधणी, उद्धव ठाकरेंसह 'हे' नाव निश्चित

राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका घेण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.

पो मुंबई, 04 मे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीची प्रश्न मार्गी लागला आहे. राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका घेण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. त्यानंतर आता शिवसेनेकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मे महिन्यात विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाले आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडून जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद आमदारकी अर्ज भरण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांची लगबग सुरू झाली आहे. शिवसेनेकडून उद्धव  ठाकरे आणि प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांची नावं विधान परिषदेसाठी निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. हेही वाचा - या कारणांमुळे मुंबईत वाढत आहे कोरोना बाधितांची संख्या, आरोग्यमंत्र्यांचा खुलासा मुंबई, ठाणे, रायगड या मतदार संघातील शिवसेनेच्या आमदारांच्या उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारी अर्जावर सह्या करण्यात आल्या असल्याचं कळतंय. त्यामुळे  उद्या मंगळवारी उद्धव ठाकरे आणि निलम गोऱ्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे. विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध ? दरम्यान, विधान परिषदेच्या 9 जागांसाठी महाविकास आघाडी 6 उमेदवार देणार, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. तर दुसरीकडे 4 जागा भाजप आमदारांच्या संख्याबळावर जिंकेल, असा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सहा आणि भाजप आणि चार उमेदवार उभे केले तर नऊ जागांसाठी दहा उमेदवार असतील. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याचं अवघड आहे. हेही वाचा - SPECIAL REPORT : राज्यात दारू विक्री का आहे महत्त्वाची? एकदा आकडेवारी पाहाच! वास्तविक महाविकास आघाडी संख्याबळानुसार पाच जागा सहज जिंकतात. फक्त एका जागेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे त्या तुलनेनं भाजपच्या जवळ असलेल्या संख्याबळानुसार, भाजपाचे अपक्षांचा पाठिंबा लक्षात घेत चौथा उमेदवार यासाठी अवघ्या चार ते पाच मतांची अधिक गरज लागत आहे. त्यामुळे भाजप कोणत्याही परिस्थितीत 14 उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचे समजत आहे. जर तसं झालं तर मात्र, नऊ जागांच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत दहा उमेदवार असं चित्र निर्माण होईल आणि त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणे कठीण आहे. परंतु, जर महाविकास आघाडीमधील काही नेते तसंच भाजपतील काही नेते एकमेकांशी संपर्क करून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नदेखील करतील. असं जर झालं तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होईल. पण  तुर्तास तरी महाविकास आघाडी आणि भाजप दोन्ही एकमेकांवर दबावतंत्राचा वापर करत आहे. एकनाथ खडसेंचीही मागणी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आता यात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे. हेही वाचा - IFSCच्या मुद्द्यावरून भाजपच्या आशिष शेलारांची शिवसेनेवर विखारी टीका 'मला महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे. त्यामुळे मला विधानपरिषदेवर संधी द्यावी', अशी मागणी आपण पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. 'मागील राज्यसभा निवडणुकीत माझ्या नावाची शिफारस करण्यात आली होती. पण, मी त्या निवडणुकीसाठी इच्छुक नव्हतो. परंतु, महाराष्ट्राच्या राजकारणात मी इच्छुक आहे. या विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी मी इच्छुक आहे. त्याबद्दल पक्ष योग्य निर्णय घेईल', अशी अपेक्षाही खडसेंनी बोलून दाखवली. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: BJP, Sanjay raut, Shivsena, Uddhav Thackery

पुढील बातम्या