या कारणांमुळे मुंबईत वाढत आहे कोरोना बाधितांची संख्या, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा खुलासा

या कारणांमुळे मुंबईत वाढत आहे कोरोना बाधितांची संख्या, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा खुलासा

'येत्या काही दिवसांमध्ये देशात दररोज 1 लाख टेस्ट केल्या जाणार आहेत, प्रत्येक संशयीताची टेस्ट केली जाईल'

  • Share this:

नवी दिल्ली 04 मे : देशात मुंबई हे कोरोनाचं सर्वात मोठं हॉटस्पॉट ठरलं आहे. देशातल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी तब्बल 20 टक्के रुग्ण फक्त मुंबईमध्ये आहेत. मुंबईचं न्यूयॉर्क तर होणार नाही ना? अषी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मोठा खुलासा केला आहे. मुंबई आणि दिल्लीत लोकांनी लॉकडाऊनचं योग्य पद्धतीने पालन केलं नाही त्यामुळे कोरोनाग्रस्तांची ंसख्या वाढली असं मत त्यांनी व्यक्त केलंय.

महानगरांपेक्षा ग्रामीण भागातल्या लोकांनी लॉकडाऊनचं चांगल्या पद्धतीने पालन केलं. त्यामुळे ग्रामीण भाग कोरोनापासून वाचला आहे असंही ते म्हणाले. देशात 10 लाख टेस्ट केल्या गेल्या असून त्यात इतर देशांच्या मानाने कमी रुग्ण निघाल्याचंही त्यांनी सांगितलं.

येत्या काही दिवसांमध्ये देशात दररोज 1 लाख टेस्ट केल्या जातील अशी माहितीही त्यांनी दिली.

राज्यात रविवारी 678 नवीन रुग्ण आढळून आलेत त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 12974 एवढी झाली आहे. तर  27  रुग्णांचा मृत्यू झाला.  115 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. आतापर्यंत 2115 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. रुग्णांचा मृत्यू आटोक्यात आणण्यासाठी सरकार अटोकाट प्रयत्न करत असून अनेक उपाय योजना करण्यात येत असल्याची माहिती दिली जात आहे.

परप्रांतीय मजूर झाले आक्रमक, पोलिसांवर दगडफेकीचा धक्कादायक VIDEO आला समोर

मुंबईत रविवारी 441 नवे कोरोना रुग्ण आढळले असून त्यामुळे मुंबईतल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 8613 वर पहोचली आहे. म्हणजे राज्यातल्या कोरोनाबाधित 12974 पैकी तब्बल 8613 रुग्ण हे फक्त मुंबईतले आहेत. त्यामुळे मुंबईत जास्त प्रयत्नांची गरज असल्याचं बोललं जातंय.

कोव्हिड-19 वेगानं पसरत असल्याचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे कोरोना रिपोर्ट येण्यासाठी लागणारा कालावधी. काही ठिकाणी रिपोर्ट येण्यासाठी 7 ते 10 दिवसांचा कालावधी लागत आहे. यामुळं कोरोनाचा प्रसार आणखी वेगानं वाढला आहे. यामुळं नवी दिल्लीतील एका रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला.

बस्स एवढंच राहिलं होतं, दुकानं उघडताच तळीरामांनी असं काही केलं...पाहा VIDEO

दिल्लीतील आंबेडकर रुग्णालयात (Ambedkar Hospital) एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला. मात्र त्यांच्या संपर्कात आलेल्या 55 वैद्यकिय कर्मचाऱ्यांना आता कोरोना झाल्याचे समोर आले आहे. याचे कारण ठरले ते कोरोना रिपोर्ट येण्यासाठी लागलेला कालावधी. 19 एप्रिल रोजी या कोरोना संशयित रुग्णाची तपासणी करण्यात आली.

त्याचे रिपोर्ट मात्र 26 एप्रिलला आले. या 7 दिवसांमध्ये या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. याआधी 13 दिवसांनी एका कोरोना रुग्णाचे रिपोर्ट आले होते.

First published: May 4, 2020, 3:33 PM IST

ताज्या बातम्या