मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

SPECIAL REPORT : राज्यात दारू विक्री का आहे महत्त्वाची? आकडेवारी पाहिल्यानंतर मान्य कराल निर्णय

SPECIAL REPORT : राज्यात दारू विक्री का आहे महत्त्वाची? आकडेवारी पाहिल्यानंतर मान्य कराल निर्णय

महाराष्ट्रातही ठिकठिकाणी दारू विक्री सुरू झाली आहे. परंतु, दारू विक्रीस परवानगी देण्यावरून काही जणांचा नाराजीचा सूर आहे.

महाराष्ट्रातही ठिकठिकाणी दारू विक्री सुरू झाली आहे. परंतु, दारू विक्रीस परवानगी देण्यावरून काही जणांचा नाराजीचा सूर आहे.

महाराष्ट्रातही ठिकठिकाणी दारू विक्री सुरू झाली आहे. परंतु, दारू विक्रीस परवानगी देण्यावरून काही जणांचा नाराजीचा सूर आहे.

मुंबई, 04 मे : लॉकडाउन 3 ची अंमलबजावणी करत असताना देशभरात दारू विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी दारू विक्री सुरू झाली आहे. परंतु, दारू विक्रीस परवानगी देण्यावरून काही जणांचा नाराजीचा सूर आहे. तर काहींनी तळीरामांना प्रोत्साहन देत असल्याचं म्हणत सरकारवर टीका केली आहे.  मात्र, महसूल खात्याची आकडेवारी पाहिले जर तुम्ही निर्णय मान्य कराल. कोरोना व्हायरसाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महिन्याभरात देशात लॉकडाउन करण्यात आलं. त्यामुळे मद्यविक्री बंद करण्यात आली होती. दारू विक्री बंद असल्यामुळे महिला आणि दारूविरोधी संघटनांनी या निर्णयावर समाधान व्यक्त केलं होतं. परंतु, तळीरामांची पुरती गैरसोय झाली होती. अखेर आता दारू विक्रीस परवानगी मिळाल्यामुळे सर्वच स्तरातून या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. हेही वाचा - पुण्यात दारू विक्रीबद्दल मोठी बातमी, प्रशासनाने केली महत्त्वाची घोषणा पण, असं असलं तरीही दारू विक्रीचा निर्णय हा राज्यासाठी फायदेशीरच असतो. राज्य उत्पादन शुल्क विभाग हे तिसऱ्या क्रमांकाचे महसूल निर्मिती विभाग आहे. या विभागाकडून दरवर्षी तब्बल २७ हजार कोटी वार्षिक उत्पन्न मिळते. राज्याला सर्वात जास्त महसूल मिळवून देणाऱ्या विभागांमध्ये पहिल्या नंबरवर जीएसटी विभागाचा आहे. जीएसटी विभाग 1 लाख कोटी आणि व्हॅटच्या माध्यमातून 30 हजार कोटी उत्पन्न राज्याला मिळते . तर दुसऱ्या नंबरवर स्टॅम ड्युटी विभागातून 27 हजार 500 कोटी राज्याला उत्पन्न मिळते. मुंबई आणि ठाण्यात किती दुकानं मुंबई शहर - 350 दुकाने मुंबई उपनगर - 769 दुकाने ठाणे - 992 पालघर - 621 रायगड - 608 विभागानुसार दुकानं कोकण विभाग - 3 हजार 341 पुणे विभाग - 1 हजार 906 नाशिक विभाग - 1 हजार 081 कोल्हापूर विभाग - 1316 औरंगाबाद विभाग - 1 हजार 664 नागपूर विभाग - 1 हजार 895 हेही वाचा - बस्स एवढंच राहिलं होतं, दुकानं उघडताच तळीरामांनी असं काही केलं...पाहा VIDEO राज्यात एकूण दुकानं - देशा दारुची दुकानं : 4 हजार 159 - वाईन शाॅप दुकानं : 1 हजार 794 - बीअर शाॅपी : 4 हजार 947 - वाईन विक्रीची दुकाने : 31 असे राज्यात एकूण 11 हजार 203 मद्य विक्रीची दुकाने आहेत. या दुकानाच्या माध्यमातून होणाऱ्या विक्रीत राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल निर्माण होतो. संपादन - सचिन साळवे
First published:

पुढील बातम्या