जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / IFSCच्या मुद्द्यावरून भाजपच्या आशिष शेलारांची शिवसेनेवर विखारी टीका

IFSCच्या मुद्द्यावरून भाजपच्या आशिष शेलारांची शिवसेनेवर विखारी टीका

IFSCच्या मुद्द्यावरून भाजपच्या आशिष शेलारांची शिवसेनेवर विखारी टीका

शिवसेनेच्या या टीकेला आता भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनीही आक्रमक उत्तर दिलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 एप्रिल : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांचं (IFSC) मुख्यालय मुंबईतून गुजरातला हलवल्याच्या आरोपावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. याचमुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप होत असताना शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर घणाघाती टीका करण्यात आली होती. शिवसेनेच्या या टीकेला आता भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनीही आक्रमक उत्तर दिलं आहे. ‘आयएफएससी आजही मुंबईत शक्य आहे. आम्हीच प्रस्ताव पाठवला होता. काँग्रेस सरकारने ते मुंबईला दिले नाही. आज ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहात त्यांना “योग्य ठिकाणी” चिमटा काढून हे विचारा एकदा. पत्रपंडित हो! कोणी उपटसुंभांनी इतिहास बदलला हेही एकदा तपासून पाहा,’ अशी विखारी टीका आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केली आहे. ‘विषय इतिहासाचा काढलाच आहात तर… छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढला, हा अजरामर इतिहास… ज्या काँग्रेस सोबत सत्तेत आहात, त्यांना मान्य आहे का ? हेही विचारुन पहा. नाहीतर तुम्ही 2009 चा मिरजेवर लिहिलेला तुमचाच (?)अग्रलेख एकदा वाचून पाहा . स्वातंत्र्यवीर सावरकरांना दुर्दैवाने समलिंगी म्हणणारे नालायक काँग्रेस सध्या तुम्हाला प्रिय वाटतेय. काँग्रेस सावरकरांचा जो इतिहास सांगत आहे तो तुम्हाला प्रिय वाटतोय..? मग आता आम्हाला कसला इतिहास शिकवताय? तुम्ही नैतिकतेच्या मुद्द्यावर केव्हाच “इतिहास जमा” झाला आहात,’ असा पलटवार आशिष शेलार यांनी केला आहे.

जाहिरात

हेही वाचा - फेसबुक युजरसाठी मोठी बातमी, आता VIDEO पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे शिवसेनेनं काय म्हटलं होतं? ‘महाराष्ट्रावरील अन्यायाचे समर्थन कसले करता?’ या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेवर सडकून टीका करण्यात आली आहे. ‘गांधीनगरला हलविण्यात आलेल्या आर्थिक केंद्राबाबत तांत्रिकदृष्टय़ा गुजरातचे बरोबर असेलही, पण दिल्लीत मोदी सरकार असल्यामुळेच गुजरातला झुकते माप मिळत आहे. मुंबईतल्या अनेक वित्तीय संस्था, उद्योग-व्यापार गुजरातला हलवून महाराष्ट्राचे मोठे नुकसान केलेच आहे. विरोधी पक्षात असताना शिवसेनेने यावर आवाज उठवला. आता हे काम फडणवीस व त्यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाने केले पाहिजे. फडणवीस हे महाराष्ट्रापेक्षा महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्यांची बाजू धरून बोलत असतील तर हा असला विरोधी पक्ष कुचकामी आहे, महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्यांना जनताच मुंबईच्या अरबी समुद्रात बुडवेल, अशी टीका सेनेनं केली आहे. संकलन, संपादन - अक्षय शितोळे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात