जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / गणेशोत्सवावरून मनसे आणि शिवसेना आमने - सामने

गणेशोत्सवावरून मनसे आणि शिवसेना आमने - सामने

गणेशोत्सवावरून मनसे आणि शिवसेना आमने - सामने

गिरगावमध्ये मंडप उभारण्यासाठी मुंबई महापालिकेनं मंडळांना परवानगी नाकारली होती. त्यामुळे शिवसेनेला आव्हान देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले आणि बिनधास्त मंडप बांधा आणि गणेशोत्सव साजरा करा असे आदेश गणेश मंडळांना दिले होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 10 ऑगस्ट : गिरगावमध्ये मंडप उभारण्यासाठी मुंबई महापालिकेनं मंडळांना परवानगी नाकारली होती. त्यामुळे शिवसेनेला आव्हान देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले आणि बिनधास्त मंडप बांधा आणि गणेशोत्सव साजरा करा असे आदेश गणेश मंडळांना दिले होते. त्यावर आता मनसेने शिवसेनेला धारेवर धरलं आहे. गणपती मंडप बांधण्याच्या कठोर नियमांविरोधात मनसेनं शिवसेना भवनासमोर मोठे पोस्टर लावले आहेत. या पोस्टरच्या माध्यमातून मनसेनं सत्ताधारी शिवसेनेवर चांगला नेम धरला आहे. ‘अयोध्याचं मंदिर नक्की बांधा पण त्याच्याआधी मुंबईत गणपती मंडप बांधण्यासाठी परवाणगी द्या.’ असं त्या पोस्टरवर लिहण्यात आलं आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांआधी ‘मला वाराणसीला जाऊन गंगापूजन करायचे आहे आणि अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घ्यायचे आहे’ शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले होते. सनातन साधकाच्या घरी सापडला बॉम्ब साठा, एटीएसची मोठी धाड ‘चलो अयोध्या.. चलो वारणसी’ चे आवाहन करणारे होर्डिंग त्यांनी मातोश्री आणि शिवसेना भवन परिसरात लावले होते आणि आता त्यावर राज ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांआधी राज ठाकरे यांनी गिरगावच्या खेतवाडीत जाऊन मंडळ अध्यक्षांची भेट घेतली आणि त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण शहराची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे यांनी बिनधास्त मंडप बांधा आणि गणेशोत्सव साजरा करा असे आदेश गणेश मंडळांना दिले होते. मंडपांसाठी मुंबई मनपा परवानगी देत नसल्याची गणेश मंडळांची तक्रार होती. हेही वाचा… मध्य रेल्वेचे मोटरमन आंदोलनाच्या पवित्र्यात, आज 500 च्यावर लोकल फेऱ्या होणार रद्द VIDEO : उद्धव ठाकरेंविरोधात अपशब्द,अंबादास दानवे आणि मराठा आंदोलकांमध्ये धक्काबुक्की

    मध्यरात्री ३ वाजता फोन करुन हा मेसेज द्यायचे शहीद मेजर कौस्तुभ राणे

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात