मध्यरात्री ३ वाजता फोन करुन हा मेसेज द्यायचे शहीद मेजर कौस्तुभ राणे

आपल्या सहा वर्षांच्या नोकरीमध्ये प्रत्येक क्षण देशासाठी जगण्याची कौस्तुभ यांनी शपथ घेतली होती

News18 Lokmat | Updated On: Aug 10, 2018 10:06 PM IST

मध्यरात्री ३ वाजता फोन करुन हा मेसेज द्यायचे शहीद मेजर कौस्तुभ राणे

मुंबई, ०९ ऑगस्ट- काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना मंगळवारी शहीद कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले. आज ९ ऑगस्ट रोजी मिरो रोड येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. ते २९ वर्षांचे होते. यावर्षी जानेवारी महिन्यात त्यांचे कॅप्टनवरून मेजर असे प्रमोशन करण्यात आले होते. आपल्या सहा वर्षांच्या नोकरीमध्ये प्रत्येक क्षण देशासाठी जगण्याची कौस्तुभ यांनी शपथ घेतली होती. राणे यांनी आपली ही शपथ शेवटपर्यंत पाळली असेच म्हणावे लागले.

सीमारेषेवर त्यांना काही दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे दिसले. दोन्हीकडून जोरदार फायरिंग करण्यात आले या फायरिंगमध्ये कौस्तुभ राणे शहीद झाले. घरातील एकुलता एक मुलगा असल्याने साहजिकच त्यांच्या कुटुंबियांना त्यांची काळजी असणार. मात्र जम्मू- काश्मिरमध्ये पोस्टिंग झाली असल्यामुळे थे फार कमीवेळा नेटवर्क मिळायचे. त्यामुळे कित्येक दिवस कौस्तुभ यांचा घरच्यांशी काहीही संबंध यायचा नाही. मात्र जेव्हा नेटवर्क मिळायचे तेव्हा ते घरच्यांना फोन करायचे. अनेकदा त्यांचा फोन हा रात्री २- ३ वाजताच यायचा. तेव्हा फोन करुन, मी सुखरूप आहे एवढाच संदेश ते नेहमी द्यायचे. आता मात्र त्यांचा मी सुखरूप असल्याचा फोन रात्री- मध्यरात्री येणार नाही या विचारानेच कुटुंबियांचे अश्रू थांबण्याचे नाव घेत नाहीयेत.

बुधवारी श्रीनगरहून मेजर राणे यांचे पार्थिव दुपारी २.१५ वाजता दिल्लीत पोहचले. दिल्लीत भारतीय सैन्य दलाकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बुधवारी रात्रभर मालाड येथील शवगृहात त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. गुरूवारी पहाटे कौस्तुभ यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी मिरारोड येथे आणण्यात आले. गुरूवारी सकाळी शासकीय इतमामात शहीद कौस्तुभ राणे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 9, 2018 02:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close