S M L

सनातन साधकाच्या घरी सापडला बॉम्ब साठा, एटीएसची मोठी धाड

पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पश्चिमेकडील भंडारआळी परिसरात एका बंगल्यात एटीएसच्या पथकाने छापा मारला आहे.

Updated On: Aug 10, 2018 09:20 AM IST

सनातन साधकाच्या घरी सापडला बॉम्ब साठा, एटीएसची मोठी धाड

विजय देसाई, अभिषेक पांडे

पालघर, 10 ऑगस्ट : नालासोपाऱ्यात एटीएसने सर्वात मोठी कारवाई केली आहे. पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पश्चिमेकडील भंडारआळी परिसरात एका बंगल्यात एटीएसच्या पथकाने छापा मारला आहे. यात संशयित आरोपी वैभव राऊतला एटीएसने ताब्यात घेतलंय. वैभव राऊतच्या घरात 8 देशी बॉम्ब सापडले आहेत. तर बॉम्ब बनवण्याची मोठी सामग्री पोलिसांनी जप्त केली आहे. डॉग स्कॉड, फॉरेन्सिक टीमकडून अद्याप या बंगल्यात तपास सुरू आहे. नालासोपारा भांडार आळीत राहणाऱ्या सनातन संस्थेचे कार्यकर्ते वैभव राऊत  यांच्या घरी गुरवारी रात्री एटीएसने धाड टाकून मोठ्या प्रमाणात स्पोटके जप्त केली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार वैभव राऊत यांच्या घरातून ८ देशी बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. त्याच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका दुकानात बॉम बनवण्याची सामग्री मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली. सांगण्यात येत आहे की, ही सामग्री गन पावडर आणि डिटोनेटर असून त्यांच्यापासून दोन डझन हून अधिक बॉम्ब बनविण्यात येऊ शकतील.वैभव राऊत याने ही विस्पोटके का आणि कशी जमा केली याचा आता एटीएस कसून तपास करत आहे. विशेष म्हणजे सामग्री सापडल्याने या घटनेची तीव्रता अधिक वाढली आहे. वैभव हा सनातनी विचारधारेचा असून कुठे घातपात करणार होता का याबाबत अजून कोणतीही माहिती मिळाली नाही. पण एटीएसची टीम गेल्या काही दिवसापासून सतत पाळत ठेऊन होती. आणि शेवटी गुरवारी रात्री त्याच्या घरी धाड टाकून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या त्याच्या घरीच कसून तपासणी सुरू आहे. डॉग स्कोड आणि फॉरेन्सिक टीम सुद्धा घटनास्थळी उपस्थित आहे. वैभव राऊत हा कट्टर हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता आहे.

त्याला घेऊन पथक मुंबईला रवाना झालीये. त्याला  कोर्टात हजर करणार आहेत. छापा टाकलेल्या बंगल्यात काही घातक सामुग्री असल्याचा सुगावा लागला होता. त्यानुसार एटीएस काही दिवसापासून नजर ठेवून होती. आणि त्यानंतर याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी छापा टाकला आहे.

VIDEO : उद्धव ठाकरेंविरोधात अपशब्द,अंबादास दानवे आणि मराठा आंदोलकांमध्ये धक्काबुक्की

Loading...
Loading...

संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या वैभव राऊतसोबत आणखी 2-3 जण काम करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलीस आता वेगळ्या पद्धतीने कारवाई करणार आहेत. काही ठराविक लोक 2-3 दिवसांनंतर वैभवच्या संपर्कात यायची त्यामुळे पोलीस चौकशीत काही महत्त्वाची माहिती मिळण्याची आवश्यकता आहे. वैभव हा रात्रीच्याच वेळी कामासाठी बाहेर पडायचा अशी माहिती सांगण्यात आली आहे. पण या सगळ्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पाऊलं उचलण्यात आली आहे.

या बंगल्यातली घातक सामुग्री शोधण्यासाठी श्वानपथक  बॉम्ब शोध आणि नाशपथक मागवण्यात आलं आहे. वजन काटा, काही पिशव्यांमध्ये सामान आढळून आलंय. परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आजूबाजूच्या परिसरात शोध मोहीम घेतली असता वजन काटा, काही पिशव्यांमध्ये काही सामान भरलेलं होतं. त्यामुळे ते सामान नेमकं कशाचं आहे याचा तपास घेण्यासाठी सगळ्या वस्तू फोरेंसिक तपासासाठी पाठवण्यात आलं आहे. पण दरम्यान, या सगळ्यामुळे आसपासच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा...

अंबादास दानवे आणि मराठा आंदोलकांमध्ये नेमकं काय घडलं ?, हाच तो व्हिडिओ

लोकलमध्ये 'किकी चँलेंज' करणं पडलं महाग, साफ करावं लागलं विरार स्टेशन

राजस्थानमध्ये मुस्लिम गावांना दिली हिंदू नावं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 10, 2018 07:51 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close