जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / मध्य रेल्वेचे मोटरमन आंदोलनाच्या पवित्र्यात, आज 500 च्यावर लोकल फेऱ्या होणार रद्द

मध्य रेल्वेचे मोटरमन आंदोलनाच्या पवित्र्यात, आज 500 च्यावर लोकल फेऱ्या होणार रद्द

प्रतिकात्मक

प्रतिकात्मक

मध्य रेल्वेनं प्रवास करणा-या प्रवाशांसाठी त्रासदायक ठरणारी बातमी आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 10 ऑगस्ट : मध्य रेल्वेनं प्रवास करणा-या प्रवाशांसाठी त्रासदायक ठरणारी बातमी आहे. मध्य रेल्वेचे मोटरमन आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. त्यामुळे सेंट्रल रेल्वेच्या सेवेवर परिणाम होऊ शकतो. मोटरमन संघटनेच्या मते लाल सिग्नल तोडण्याच्या चुकींवरून बडतर्फे केंल जातय. तर ही कारवाई चुकीची असल्यानं तात्काळ ती थांबवावी या मागणी साठी हे आंदोलन केलं जाण्याची शक्यता आहे. तर यात 24 मोटरमन्सला कंपल्सरी रिटायर करण्याचा तुघलकी निर्णय घेण्यात आल्याने मोटरमन हे आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आजपासून सर्व मोटरमन आपली अतिरिक्त सेवा देणार  नाहीत (म्हणजे OT करणार नाहीत परिणामस्वरूप 500 ते 600 गाड्या कॅन्सल होतील. SPAD म्हणजे लाल सिग्नल चुकून पासिंग झाल्यास 24 मोटरमनला CRS म्हणजे कॅम्पलसरी रिटायर करण्याचा रेल्वे चा तुघलकी निर्णय लादण्यात आला आहे जो यापूर्वी नव्हता. त्यामुळे आता रेल्वेच्या मोटरमनने आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. सनातन साधकाच्या घरी सापडला बॉम्ब साठा, एटीएसची मोठी धाड फक्त 700 मोटरमन उपलब्द आहेत व 290 रिक्त जागा असताना गेले 3 वर्ष सर्वजण अधिक चे काम करत आहेत. याचाच मोबदला म्हणून की काय मोटरमन ला हे बक्षिस मिळत आहे.  600 ते 700 नवीन स्टाफ भरती होऊन एक ते दोन वर्षे झाली तरी प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे, चुकीची प्रमोशन पॉलीसी अवलंबल्यामुळे एवढ्या दिवसात एकही मोटरमन बनु नाही शकला. मोटरमन ऊन,वारा,पाऊस,समाज,कुटुंब,नातेवाईक,सण, उत्सव न बघता चोविस तास अहोरात्र इमाने-इतबारे काम करणारा मुंबईच्या जीवन वाहिनीचा सारथी आहे. हेही वाचा… मराठा मोर्चाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल, 13 ऑगस्टला सुनावणी VIDEO : उद्धव ठाकरेंविरोधात अपशब्द,अंबादास दानवे आणि मराठा आंदोलकांमध्ये धक्काबुक्की अंबादास दानवे आणि मराठा आंदोलकांमध्ये नेमकं काय घडलं ?, हाच तो व्हिडिओ

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात