मुंबई, 08 फेब्रुवारी : 'राज्यात राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमात अश्लिल पद्धतीने डान्सचे कार्यक्रम केले जातात. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कमीपणा आणणारा प्रकार आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे, लावणी असेल पण लावण्याच्या नावाखाली अश्लिलता होता कामा नये' असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांनी तरुणांना भुरळ घातली आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या वाढदिवस असो की गावचा कार्यक्रम असो गौतमी पाटीलला पहिल निमंत्रण असतं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही गौतमीला बोलावण्याचे प्रकार घडले, त्यामुळे अजित पवार चांगलेच संतापले.
सतत चर्चेत असणारी डान्सर गौतमी पाटील कोण आहे? पाहा Inside Story
'राज्यात राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमात अश्लिल पद्धतीने डान्सचे कार्यक्रम केले जातात. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कमीपणा आणणारा प्रकार आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे, लावणी असेल पण लावण्याच्या नावाखाली अश्लिलता होता कामा नये. काही जिल्ह्यात बंदी आहे. याची सविस्तर माहिती घेणार. परंपरा टिकली पाहिजे. त्याला कुणी चुकीचा पायंडा पाडत असेल त्यावर मी अधिवेशनात तो मुद्दा मांडेन, असं अजितदादा म्हणाले.
शिवसेना वादावर ठाकरेंची अचानक पत्रकार परिषद का? शिंदे गटाने सांगितली Inside Story
तसंच, 'आता असे कार्यक्रम ठेवण्याची स्पर्धाच लागली आहे. अशा कार्यक्रमांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेसच बोर्ड असतो. हे योग्य नाही. आम्ही जिल्हाप्रमुख पदाधिकारयांना तशा सूचना देण्यात येतील' असा तंबीही अजितदादांनी कार्यकर्त्यांना भरली.
'बावणकुळेंना मातीचं घरं जरी वाटतं असलं तरी आतून आमचं घर मजबूत आहे. शिक्षकांनी काय निकाल दिला तो बघा. जनता जनार्धन सर्वस्व आहे. एकीकडे बारामती ते फिरायला जातात. काहींनी आमच़्याबद्दल बेताल वक्तव्य केलं काम पाहून समाधानी झाले, असा टोलाही अजितदादांनी लगावला.
Uddhav Thackery : निवडणूक आयोग शिंदे गटाच्या बाजूने निर्णय देणार? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
'आदित्य ठाकरे वेगवेगळे दौरे करत आहे. त्यांना प्रतिसाद मिळतोय. बाकी च्यांना तसे प्रतिसाद मिळत नाहीत. अनेकांना ते बघवत नाही. सत्ता ही जमिनीवर पाय ठेवून राबवायी असते. रडीचा डाव खेळायचा नसतो. इतर मंत्री फिरतात तेव्हा आम्हीही त्यांचा मान ठेवतो. मात्र दगड मारणे, शाई फेकणं हे बरोबर नाही. कायदा हातात कुणी घेऊ नये, असं म्हणत अजित पवार यांनी शिंदे गटाला टोला लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Gautami Patil, Maharashtra News, NCP, Politics