मुंबई, 08 फेब्रुवारी : 'निवडणूक आयोगाचा निकाल आमच्याविरोधात अजिबात लागणार नाही. आम्हाला निवडणूक आयोगाने जी माहिती मागितली ती आम्ही दिली आहे. शपथपत्र दिले, सदस्य संख्या दिली आहे. अचानक मागील वेळी शिंदे गटाकडून हे निवडून आलेल्या प्रतिनिधीवर ठरवा अशी मागणी केली होती. त्यामुळे दुर्दैवी निवडणूक आयोगाने जर निर्णय द्यायचा असता तर निवडणूक आयोगाने आधीच दिला असता. शिवसेनेचं पारडं जड झालं आहे. त्यामुळे दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे' असंही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ठामपणे सांगितलं
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या सुनावणीबद्दल मोठा खुलासा केला आहे. तसंच यावेळी निवडणूक आयोग निर्णय शिवसेनेच्या विरोधात देणार आहे का, या प्रश्नाचे उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं.
'निवडणूक आयोगाचा निकाल आमच्याविरोधात अजिबात लागणार नाही. शिवसेनेचं काय होणार, धनुष्यबाण चिन्हाचं काय होणार याबद्दल लोकांच्या मनात प्रश्न आहे. आम्हाला निवडणूक आयोगाने जी माहिती मागितली ती आम्ही दिली आहे. व्यवस्थितीपणे दिले आहे. शपथपत्र दिले, सदस्य संख्या दिली आहे. अचानक मागील वेळी शिंदे गटाकडून हे निवडून आलेल्या प्रतिनिधीवर ठरवा अशी मागणी केली होती. त्यामुळे दुर्दैवी निवडणूक आयोगाने जर निर्णय द्यायचा असता तर निवडणूक आयोगाने दिला असता. पण आम्ही कोणत्याही एजन्सी आणि संस्था लावल्या नाही. आणि जर हे असं होतं, शपथपत्रावर आक्षेप घेतला होता. त्यांना कळलं आहे, शिवसेनेचं पारडं जड झालं आहे. त्यामुळे दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
(Kasba by-election : कसबा चिंचवडमध्ये मनसेचा पाठिंबा कोणाला? मोठी अपडेट समोर)
20 जूनला पक्षादेश मोडून विधान परिषदेच्या निवडणुकीत गद्दारी केली. त्या गद्दारीनी शिवसेनेवर दावा करावा हे नीचपणाचे आहे. हे घडले जूनमध्ये आणि जुलैमध्ये हा गट निवडणूक आयोगाकडे गेला आणि सेनेवर दावा केला. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये अपात्रेचा निर्णय झाला पाहिजे, त्यानंतर निवडणूक आयोगात सुनावणी व्हावी, अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
'दुसरी शिवसेना आम्ही मानत नाही. आमच्यासोबत जे लाखो शिवसैनिक आहे, त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. लोकांच्या पाठिंब्यावर हा पक्ष उभा आहे. बाळासाहेबांनी शिवसेना पक्ष स्थापन केला. जर आमदार आणि खासदारांच्या संख्येवर पक्ष असल्याचा दावा केला जात असेल तर उद्या कुणीही पक्ष फोडून पंतप्रधान होऊ शकतो, याला गद्दारी म्हणतात, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.
विधिमंडळ आणि संसदेत पक्ष स्थापन होत असतो, आणि दुसरा पक्ष हा रस्त्यावरच असतो. निवडणूक आयोगाने स्वत: ची घटना स्थापन केली आहे. पक्षाध्यक्षपादाची जी निवडणूक 23 जानेवारीला होणे अपेक्षित होती, याची मागणी केली आहे. पण निवडणूक आयोगाने कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे ही निवड आयोग जेव्हा निर्णय देतील तेव्हा होईल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
(शिंदे सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून, फडणवीस सादर करणार अर्थसंकल्प!)
शिवसेनाप्रमुख हा शब्द बाळासाहेब ठाकरे यांना शोभून दिसतो. त्यामुळे तो आम्ही गोठून ठेवला आहे. पक्षप्रमुख म्हणून माझ्या नावाची घोषणा केली. मी गेल्या अनेक वर्षांपासून या पदावर काम पाहतोय, शिवसेनेत मुख्य नेता हे पद घटनाबाह्य आहे. ज्या गद्दारांनी शिवसेनेवर दावा सांगितला आहे, त्या गद्दारांनी सेनेची घटनाच मान्य नसल्याचे सांगितलं आहे. शिवसेनेत विभागप्रमुख हे पद मुंबईत तयार केलं आहे. पण शिंदे गटाने वेगळं पद तयार केलं आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरेंंनी केली.
निवडणूक आयोगाकडे सदस्य संख्या, शपथपत्र सादर केली आहे. शिंदे गटाचा दावा हा निवडून आलेले खासदार आणि आमदार म्हणजे हा पक्ष असेल तर हा दावा हास्यास्पद आहे. निवडणूक आयोगाने एवढे दिवस थांबण्याची गरज नव्हती. गावोगावी जाऊन आम्ही शपथपत्र भरून घेतली आहे. शपथपत्र पाहून यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. सर्व कागदपत्र आम्ही निवडणूक आयोगात सादर केली आहे, अशी माहितीही उद्धव ठाकरेंनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shivsena, Uddhav tahckeray