मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शिवसेना वादावर ठाकरेंची अचानक पत्रकार परिषद का? शिंदे गटाने सांगितली Inside Story

शिवसेना वादावर ठाकरेंची अचानक पत्रकार परिषद का? शिंदे गटाने सांगितली Inside Story

शिंदे गटाचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

शिंदे गटाचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

शिवसेना कुणाची यावरून सुरू असलेल्या वादावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन नवी मागणी केली आहे. यावर शिंदे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 8 फेब्रुवारी : शिवसेना कुणाची यावरून सुरू असलेल्या वादावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन नवी मागणी केली आहे. सुप्रीम कोर्टात जोपर्यंत 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगातली सुनावणी होऊ नये, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी यासाठी पत्रकार परिषद घेतली. शिवसेना कुणाची हा वाद सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगात असताना उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद का घेतली? असा प्रश्न उपस्थित होत आहे, यावरून एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांनीही पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. 'कायद्याच्या दृष्टीकोनातून दिशाभूल आणि संभ्रम निर्माण करणारी पत्रकार परिषद होती. महाराष्ट्राच्या जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी पत्रकार परिषद होती. अनिल देसाई यांनी पक्षाची लोकशाही प्रक्रिया सांगितली. पक्षप्रमुख पदाबाबत आम्हाला आक्षेप नव्हता. मात्र इतर पद जी आहेत, ती कशी भरली गेली? कुठल्या शिवसैनिकांनी मतदान केलं, पद निवडताना कुठल्या हॉलमध्ये मतदान झालं? 2013, 2018 ला मतदान घेतलं, तर मुंबईत मतदान कधी झालं?' असे प्रश्न राहुल शेवाळे यांनी विचारले.

'सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर निवडणूक आयोगाची कार्यवाही सुरू झाली. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, पण त्यांना दुर्दैवाने माहिती नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयामध्ये कुठलेही कोर्ट हस्तक्षेप करत नाही. जर निवडणूक प्रक्रिया राबवली असेल तर पुरावे द्यावे. सहानुभूती निर्माण करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे,' अशी टीका राहुल शेवाळे यांनी केली.

दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. 'सध्या या संदर्भात निवडणूक आयोगाकडे आणि सुप्रीम कोर्टात केसेस सुरू आहेत. त्यांचं जे काही म्हणणं आहे ते त्यांनी सुप्रीम कोर्टात किंवा निवडणूक आयोगात सांगावं. फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी हे सुरू आहे. सहानुभूतीच्या जोरावर जनमत मिळवून मतं मिळावी, असं सुरू आहे. त्यांना काय वाटतं हे महत्त्वाचं नाही,' असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

First published:

Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav Thackeray