Home /News /mumbai /

आमदारांचं अपहरण झाल्याचा संजय राऊतांचा आरोप खरा की खोटा? बंडखोरांचं पत्र आलं समोर

आमदारांचं अपहरण झाल्याचा संजय राऊतांचा आरोप खरा की खोटा? बंडखोरांचं पत्र आलं समोर

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थक सर्व आमदारांनी एक अँफिडेव्हिट ( शपथपत्र ) तयार केलं आहे. ज्यात सर्व आमदारांनी आम्ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहोत, असं म्हटलं आहे.

मुंबई 24 जून : संजय राऊत यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत असा दावा केला, की शिवसेनेच्या आमदारांचं अपहरण करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदेसोबत (Eknath Shinde) असलेले हॉटेल रेडिसन ब्लूमधील 21 आमदार आमच्या संपर्कात असून मुंबईत येताच ते आमच्याकडे परत येणार आहेत. त्यामुळे आमच्याकडे बहुमताचा आकडा आहे. मात्र, आता बंडखोर आमदारांनीच संजय राऊतांचा (Sanjay Raut) हा दावा खोटा सिद्ध केला आहे. बंडखोर आमदारांवर आठवड्याला होणाऱ्या खर्चात निघेल गरीबाचं पूर्ण आयुष्य; 70 खोल्यांचं भाडं माहितीये का? शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थक सर्व आमदारांनी एक अँफिडेव्हिट ( शपथपत्र ) तयार केलं आहे. ज्यात सर्व आमदारांनी आम्ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहोत. आमच्यावर कुणीही जबरदस्ती केलेली नाही. आम्ही स्वतःहून एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या गटामध्ये सहभागी झालो आहोत, असं लिहिलं आहे. यानंतर आता संजय राऊत यांनी केलेला दावा आणि आरोप खोटा समजायचा का? असा प्रश्न उपस्थित होतो. Shivsena Bhaskar Jadhav : कोकणातील शिवसनेचा आक्रमक चेहरा कुठेही गेला नाही आम्ही चिपळूनमध्येच संजय राऊत काय म्हणाले होते? भाजपच्या ताब्यातीला 21 आमदारांचा आमच्याशी संपर्क झाला असल्याचं राऊत म्हणाले होते. ज्यादिवशी मुंबईला येतील तेव्हा 21 आमदार शिवसेनेसोबत असतील. सर्वांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. तर भाजपने नेलेल्या आमदारांपैकी 2 आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील परत आले आहेत, असंही ते म्हणाले. सर्व मिळून भाजपने अपहरण केलेले 21 आमदार मुंबईत येताच आपल्यासोबत येणार असल्याचा दावा राऊत यांनी केला. महाविकास आघाडीचा विजय होईल इतका आकडा आमच्याकडे आहे, असा दावाही ऱाऊतांनी केला होता. सोबतच सर्वांना गुलाम बनवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Eknath Shinde, Mla, Sanjay raut, Shivsena

पुढील बातम्या