Home /News /national /

बंडखोर आमदारांवर आठवड्याला होणाऱ्या खर्चात निघेल गरीबाचं पूर्ण आयुष्य; 70 खोल्यांचं भाडं माहितीये का?

बंडखोर आमदारांवर आठवड्याला होणाऱ्या खर्चात निघेल गरीबाचं पूर्ण आयुष्य; 70 खोल्यांचं भाडं माहितीये का?

मागील एक दोन दिवसांपासून तुम्ही सतत या पंचतारांकित हॉटेलचं नाव ऐकत असाल. मात्र, या हॉटेलमध्ये राहाण्यासाठी किती खर्च आला असेल, हे तुम्हाला माहितीये का?

    मुंबई 24 जून : महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाने सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे. या भुकंपाचं मूळ मात्र गुजरातमधून सुरू झालं. शिवसेनेचे बंडखोर आमदार (Shivsena Rebel MLA) सुरूवातील गुजरातमधील सूरतमध्ये थांबलेले होते. यानंतर या आमदारांना आसाममधील गुवाहाटी येथील हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये ठेवण्यात आलं आहे. हे गुवाहाटीमधील पंचतारांकित हॉटेल आहे. Shivsena Bhaskar Jadhav : कोकणातील शिवसनेचा आक्रमक चेहराही शिंदे गटाच्या गळाला? सध्या दररोज अनेक शिवसेना आमदार या हॉटेलमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. हॉटेलबाहेर आमदारांच्या सुरक्षेसाठी आणि हे आमदार फुटू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मागील एक दोन दिवसांपासून तुम्ही सतत या पंचतारांकित हॉटेलचं नाव ऐकत असाल. मात्र, या हॉटेलमध्ये राहाण्यासाठी किती खर्च आला असेल, हे तुम्हाला माहितीये का? मिळालेल्या माहितीनुसार, रेडिसन ब्लू या पंचतारांकित हॉटेलमधील 70 खोल्या या आमदारांसाठी बुक करण्यात आल्या आहेत. या खोल्यांचं आठवडाभराचं एकत्रित भाडं तब्बल 58 लाख रूपये इतकं असल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे. याशिवाय आमदारांच्या खानपानावर याठिकाणी दररोज 8 लाख रूपये खर्च करण्यात येतात, अशी माहितीही समोर आली आहे. एकंदरीतच आमदारांच्या राहाण्याची सोय, खानपानाचा खर्च आणि चार्टर्ड विमानाने होणाऱ्या प्रवासाचा खर्च कोट्यवधींच्या घरात आहे. 'महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी डोळ्यात पाणी आणून विनवण्या केल्या, पण..', एकनाथ शिंदेंच्या नाराजीची कारणं आता जाणून घेऊया आमदार थांबले असलेल्या हॉटेल रेडिसन ब्लूची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत - 1) या पंचतारांकित हॉटेलमध्ये 190 खोल्या आहेत. 2) 190 पैकी 70 खोल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी बुक करण्यात आल्या आहेत. 3) या हॉटेलचं व्यवस्थापन सध्या कोणाचंही नवीन बुकिंग घेत नाही. 4) रेडिसन ब्लूचे बॅक्वेट बंद करण्यात आले आहे 5) सध्या या हॉटेलमध्ये राहात असलेल्यांनाच तिथल्या भोजनकक्षात (रेस्टॉरंटमध्ये) जाण्याची परवानगी आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या