Home /News /maharashtra /

Shivsena Bhaskar Jadhav : कोकणातील शिवसनेचा आक्रमक चेहरा कुठेही गेला नाही आम्ही चिपळूनमध्येच

Shivsena Bhaskar Jadhav : कोकणातील शिवसनेचा आक्रमक चेहरा कुठेही गेला नाही आम्ही चिपळूनमध्येच

राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत (ncp and congress) काम करायच नाही महाविकास आघाडीतून (mahavikas aghadi) बाहेर पडा असे म्हणत एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी मागणी केली आहे.

  मुंबई, 24 जून : मागच्या तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra political situation) घमासान सुरू आहे. एकनाथ शिंदे (eknath shinde in guwahati) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरीकरून 40 च्यावर आमदार गुवाहाटी (guwahati) येथे घेऊन गेले. आम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत (ncp and congress) काम करायच नाही महाविकास आघाडीतून (mahavikas aghadi) बाहेर पडा असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी मागणी केली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या गोटात हळूहळू शिवसेनेचे अनेक आमदार सामिल होत आहेत. दरम्यान  कोकणातील शिवसेनेचे महत्वाचे नेते मानले जाणारे भास्कर जाधवही सध्या नॉट रिचेबल असल्याने चर्चेला उधाण आले आहे.

  भास्कर जाधव शिंदे गटात सामिल झाल्याची शक्यता आहे. जाधव हे गुहागरचे शिवसेनेचे आमदार आहेत ते सेनेचे आक्रमक आमदार म्हणून ओळखले जातात. जाधव यांनी महाविकास आघाडीच्या वतीने भाजपला जोरदार विरोध केला होता. परंतु त्यांना मागच्या दोन दिवसांपासून जाधव यांना शिंदे गटाकडून फोन करून संपर्क करण्यात येत होता. दरम्यान ते नॉट रिचेबल असल्याने नेमके ते काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान ते सुरत मार्गे गुवाहाटीला पोहोचणार असल्याचे बोलले जात आहे.

  दरम्यान भास्कर जाधव यांच्ये स्विय सहाय्यक यांनी याबाबत खुलासा केला आहे. जाधव हे चिपळूणमध्येच आहेत त्यांच्या बंधूची शस्रक्रिया झाल्यामुळे जाधव चिपळूण मध्ये आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. वरिष्ठ नेत्यांना कल्पना देऊनच जाधव गावी आल्याचे सांगण्यात आले. भास्कर जाधव गुहावटीमध्ये गेल्याच्या बातम्या निराधार असल्याचेही सांगण्यात आले.

  हे ही वाचा : आमदारांच्या केसालाही धक्का लावल्यास...; राणेंची थेट शरद पवारांनाच धमकी

  उद्धव ठाकरे यांची 12 वाजता बैठक

  आज शिवसेना भवनात राज्यभरातील शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांची बैठक घेण्यात येणार आहे. दरम्यान दुपारी १२ वाजता बैठकीसाठी बोलावण्यात आलं आहे. शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर पहिल्यांदाच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनात येणार आहेत. 

  बंडखोर आमदारांनी निवडला गटनेता

  शिवसेना नेते एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना घटक पक्षाची बैठक झाली. या बैठकीत शिवसेना विधिमंडळ गटनेते पदी एकनाथ शिंदे आणि प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आलीय. या बैठकीचा अहवाल पत्र शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि विधान परीषद अध्यक्ष रमराजे निंबाळकर यांना पाठवलं आहे. शिवसेनेच्या या नव्या घटक पक्षाच्या अधिकृत पत्रावर शिवसेनेच्या 37 आमदारांच्या सह्या आहेत.

  हे ही वाचा : एकनाथ शिंदेंच्या व्हिडीओनंतर शरद पवारांनी वाचली राष्ट्रीय पक्षांची यादी, भाजपाबद्दल म्हणाले...

  दरम्यान, एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर देत शिवसेनेने बंडखोर आमदारांपैकी 12 जणांची आमदारची रद्द करा अशी मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. यासंदर्भात कायदेशीर पिटीशन दाखल केल्याचंही शिवसेना नेत्यांकडून सांगितलं जात आहे. पक्षाच्या विधीमंडळ बैठकीत गैरहजर आणि व्हिप काढला असताने न आल्याचं कारण देत शिवसेनेने 12 आमदारांविरोधात कारवाई केली आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Bhaskar jadhav, BJP, Eknath Shinde, Konkan, NCP, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या