मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

काँग्रेसची वादग्रस्त पुस्तिका : सावरकरांच्या नातवाला भेटायचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टाळलं

काँग्रेसची वादग्रस्त पुस्तिका : सावरकरांच्या नातवाला भेटायचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टाळलं

नथुराम गोडसे आणि सावरकर यांचे समलिंगी संबंध असल्याचा उल्लेख या पुस्तिकेत आहे.  या पुस्तिकेवर बंदी घालण्याची मागणी भाजपकडून होत आहे. याच संदर्भात रणजीत सावरकर मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करत होते.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

अभिषेक पांडे

मुंबई, 3 जानेवारी : स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त मजकूर असणारी बुकलेट मध्य प्रदेशात काँग्रेसकडून वितरित करण्यात आली. नथुराम गोडसे आणि सावरकर यांचे समलिंगी संबंध असल्याचा उल्लेख या पुस्तिकेत आहे.  या पुस्तिकेवर बंदी घालण्याची मागणी भाजपकडून होत आहे. शिवसेनेनं वारंवार सावरकरांविषयी आदर व्यक्त केला असला, तरी आता काँग्रेसवर कारवाईची मागणी होऊ लागल्याने शिवसेनेची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकांच्या नातवाला भेटायचं टाळलं, असं वृत्त येत आहे.

सावरकरांबद्दल अपप्रचार करणारे राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सेवादलाविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी  जोर धरत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तशी मागणी करण्यासाठी स्वा. सावकरांचे नातू रणजीत ठाकरेंची भेट घेण्यासाठी उत्सुक होते. पण मुख्यमंत्री ठाकरे त्यांना न भेटताच निघून गेले. रणजीत सावकर यांनी चिठ्ठी पाठवून आणि मेसेज करून भेटायची वेळ मागितली होती. पण ठाकरे यांनी त्यांची भेट मुद्दाम टाळल्याची माहिती आहे.

संबंधित - काँग्रेसच्या वादग्रस्त 'बुकलेट'वर बंदी घाला, भाजपसह शिवसेनाही आक्रमक

सावकरांविषयी वादग्रस्त मजकूर असलेली ही पुस्तिका  (booklet) मध्य प्रदेशात भोपाळमध्ये वाटण्यात आली. या पुस्तिकेवरून वादाला तोंड फुटलं आहे. सावरकर यांची बदनामी करणाऱ्या पुस्तिकेवर महाराष्ट्रात बंदी घाला, अशी मागणी भाजपने केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सावरकर देशाला प्रिय आहेत आणि यापुढेही राहतील, असं स्पष्ट केलेलं असलं, तरी आता कारवाईप्रश्नी शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार यांनी या मुद्द्यावरून काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. शिवसेनेलाही लक्ष्य केलं आहे. "ही त्या पक्षाची बौद्धिक आणि मानसिक दिवाळखोरी आहे. या अशा दिवाळखोर पक्षाशी अनैसर्गिक आघाडी केलेली शिवसेना तीव्र निषेध नोंदवून या पुस्तकावर महाराष्ट्रात बंदी घालणार, की केवळ सत्तेसाठी आपल्या आराध्यांचे असे अपमान वारंवार सहन करणार?" असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

-----------

अन्य बातम्या

औरंगाबादमध्ये समसमान मते पडल्याने मोठा वाद, बंडखोर उमेदवारासोबत भिडले शिवसैनिक

उद्धव ठाकरेंना सातबारा तरी कळतो का? सगळाच बटट्याबोळ; भाजपची सडकून टीका

महाविकास आघाडी फुटली, खडसे-महाजनांच्या रणनीतीमुळे जळगावात फुलले 'कमळ'

CAA विरोधातल्या निदर्शकांबाबत SIT चा धक्कादायक खुलासा

First published:

Tags: Uddhav Thackeray (Politician), V.D. Savarkar