मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

औरंगाबादमध्ये समसमान मते पडल्याने मोठा वाद, बंडखोर उमेदवारासोबत भिडले शिवसैनिक

औरंगाबादमध्ये समसमान मते पडल्याने मोठा वाद, बंडखोर उमेदवारासोबत भिडले शिवसैनिक

शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार आणि शिवसैनिक समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं.

शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार आणि शिवसैनिक समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं.

शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार आणि शिवसैनिक समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं.

  • Published by:  Akshay Shitole

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 3 जानेवारी : औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील मतदान प्रक्रियेमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. दोन्ही गटाला समसमान मतदान पडल्याने प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. त्यानंतर शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार आणि शिवसैनिक समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं.

शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार देवयानी डोनगावकर यांची गाडी शिवसैनिकांनी अडवली. त्यानंतर काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार केला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेच्याच अध्यक्षा देवयानी डोनगावकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत रंगत निर्माण झाली.

शिवसेनेतून बंडखोरी करून देवयानी डोनगावकर यांनी अर्ज दाखल केल्याने भाजपने त्यांना मतदान करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे औरंगाबादमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अटीतटीची लढत झाली आहे.

राज्यात महाआघाडीचे भाजपसमोर मोठं आव्हान

विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी ऐतिहासिक आघाडी केली. त्यामुळे राज्यातील चित्र तर पालटलंच पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांतही राजकीय भूकंप होऊ लागले आहेत. तीन पक्षांची ताकद एकजूट होऊ लागल्याने भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा भाजपचा डाव फसला, 4 सदस्यही फुटले!

कोल्हापूर गमावलं

कोल्हापूर जिल्हा परिषदही भाजपच्या हातातून गेली असून महाविकास आघाडीला तिथे सत्ता मिळाली आहे. भाजपचे दिग्गज नेते चंद्रकांत पाटील यांना हा मोठा धक्का मानला जातोय. पश्चिम महाराष्ट्रातली ही मोठी राजकीय उलथापालथ मानली जातेय. या नव्या समिकरणामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता आज संपुष्टात आली. दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेने आपले सदस्य सहलीवर नेले होते तर भाजप आणि महाडिक गटाचे सदस्यही सहलीवर होते. दोन्हीकडचे सदस्य जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाल्यानंतर निवडीमध्ये अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. काँग्रेसचे बजरंग पाटील यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी चे सतीश पाटील यांची निवड झाली आहे.

नाशिकही हातातून गेलं

नाशिक जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिवसेनेच्या बाळासाहेब क्षीरसागर निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सयाजी गायकवाड यांना संधी मिळाली आहे. महाविकास आघाडीच्या झंझावातासमोर भाजपने दोन्ही पदांसाठी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

First published:

Tags: Aaurangabad, Aurangabad news