पुणे 03 जानेवारी : रखडलेलं खातेवाटप, कर्जमाफी आणि सावरकरांचा अपमान या मुद्यांवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केलीय. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यांनी सातबारा कोरा न करता शेतकऱ्यांच्या तोंड्याला पाने पुसली अशी टीका पाटील यांनी केली. मुख्यमंत्र्यांना सातबारा काय असतो हे तरी कळतो का? असा सवालही त्यांनी केलाय. शिवसेनेकडे देण्यासाठी आहे तरी काय? कोल्हापूरमध्ये शिवसेना विरोधकांना जाऊन मिळली त्यामुळे आम्हाला अपयश आलं. आम्हाला हरवण्यासाठी सर्वाना एकत्र यावे लागेल,सोलापुर सांगलीत आम्ही आलो हे लक्ष्यात ठेवा असंही ते म्हणाले. चंद्रकांत पाटील म्हणाले, एकनाथ खडसेंची पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा व माझ्याशी भेट झाली. त्याची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले ते शिवसेनेत जातील याला काही अर्थ नाही. सत्तेसाठी सरकारने नीतिमूल्ये सोडली आहेत. तीनही पक्षांना जनतेच्या प्रश्नाचं काही पडलं नाही. उद्धव ठाकरे व त्यांचा मुलगा कॅबिनेट झाले यांना बाकीच्यांशी काही घेणं देणं नाही.
मध्यप्रदेश काँग्रेस सेवा दलाने एक पुस्तक प्रकाशित केलीय त्यात सावरकर व गोडसे यांच्यात समलैगिक संबंध होते असा उल्लेख आहे ही निंदनीय आहे. आम्ही त्याचा जाब सरकारला विचारणार आहोत. दोन वर्षांपूर्वी रश्मी वहिनींना सिध्दीविनायक ट्रस्टचं अध्यक्ष करूया असं मी उध्दवजींना म्हणालो होतो. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ठाकरेंच्या घरात कुणी पदं घेत नाहीत. आणि आता एकावर एक पद घेतलंय.
VIDEO कोल्हापुरात महिलांनी खासदारांसमोरच घेतल्या नदीत उड्या
अजूनही गुप्त पध्दतीने अध्यक्षांची निवडणुक घ्या असं आव्हान या सरकारला देतो. हे घाबरट लोक आहेत. गृहमंत्रीपद कुणी घेत नसेल तर सेनेला देऊन टाका. हे साखरेचा विषय आला की जयंत पाटील, महसूलचा विषय आला की थोरात मग तुम्ही काय फक्त वडिलांची इच्छा पूर्ण करायला मुख्यमंत्री झालात का? असा सवालही त्यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.