मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाविकास आघाडी फुटली, खडसे-महाजनांच्या रणनीतीमुळे जळगावात फुलले 'कमळ'

महाविकास आघाडी फुटली, खडसे-महाजनांच्या रणनीतीमुळे जळगावात फुलले 'कमळ'

 जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांची रणनीती यशस्वी झाली आहे.

जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांची रणनीती यशस्वी झाली आहे.

जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांची रणनीती यशस्वी झाली आहे.

राजेश भागवत,(प्रतिनिधी)

जळगाव,3 जानेवारी: जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांची रणनीती यशस्वी झाली आहे. भाजपने महाविकास आघाडीला सुरुंग लावत जिल्हा परिषदेत 'कमळ' फुलवले आहे. अध्यक्षपदी रंजना पाटील तर उपाध्यक्षपदी लालचंद पाटील विजयी झाले आहेत.

जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी शुक्रवारी दुपारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. गेल्या दोन दिवसात राजकीय हालचाली वेग आला होता. या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप व विरोधी महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. माजी मंत्री एकनाथराव खडसे व आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही निवडणूक लढवली. शेवटच्या क्षणी भाजपची फत्ते होऊन अध्यक्षपदी रंजना पाटील तर उपाध्यक्षपदी लालचंद पाटील यांची निवड झाली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

भाजपला एकाच दिवसात दुसरा मोठा धक्का

दरम्यान, राज्याची सत्ता हातातून गेल्यानंतर भाजपला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत धक्का बसला आहे. नाशिक जिल्हा परिषदेची सत्ता हातातून गेल्यानंतर आता कोल्हापूर जिल्हा परिषदही भाजपच्या हातातून गेली असून महाविकास आघाडीला तिथे सत्ता मिळाली आहे. भाजपचे दिग्गज नेते चंद्रकांत पाटील यांना हा मोठा धक्का मानला जातोय. पश्चिम महाराष्ट्रातली ही मोठी राजकीय उलथापालथ मानली जातेय. या नव्या समिकरणामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता आज संपुष्टात आली. दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेने आपले सदस्य सहलीवर नेले होते तर भाजप आणि महाडिक गटाचे सदस्यही सहलीवर होते. दोन्हीकडचे सदस्य जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाल्यानंतर निवडीमध्ये अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. काँग्रेसचे बजरंग पाटील यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी चे सतीश पाटील यांची निवड झालीय.

नाशिकही हातातून गेलं

नाशिक जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिवसेनेच्या बाळासाहेब क्षीरसागर निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सयाजी गायकवाड यांना संधी मिळाली आहे. महाविकास आघाडीच्या झंझावातासमोर भाजपने दोन्ही पदांसाठी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी शिवसेनेनं दिलेल्या उमेदवाराला राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही पाठिंबा दिला. त्यामुळे अध्यक्षपदासाठीचं संख्याबळ जुळून आलं. त्यामुळे अखेर भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला.

एकीकडे नाशिकमध्ये भाजपला धक्का बसला असतानाच पश्चिम महाराष्ट्रातही आज राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. 'कोल्हापूर जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता आज संपुष्टात येणार आहे. काही वेळापूर्वीच कोल्हापूर जिल्हा परिषदेची सभा सुरू झाली असून अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये महाआघाडीला यश मिळणार आहे,' असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

First published: