Home /News /national /

CAA विरोधातल्या निदर्शकांबाबत SIT चा धक्कादायक खुलासा; दंगलीमध्ये 15 हून अधिक बांग्लादेशी

CAA विरोधातल्या निदर्शकांबाबत SIT चा धक्कादायक खुलासा; दंगलीमध्ये 15 हून अधिक बांग्लादेशी

दिल्लीत 20 डिसेंबर रोजी झालेल्या हिंसाचारात काही गटांनी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात धक्कादायक माहिती SIT च्या (Special Investigation Team) तपासात पुढे आली आहे.

    नवी दिल्ली, 3 जानेवारी :  नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी काही आंदोलकांनी हिंसक निदर्शनं केली. राजधानी दिल्लीत डिसेंबर महिन्यात काही ठिकाणी समाजकंटकांनी जाळपोळही केली. दिल्लीत 20 डिसेंबर रोजी झालेल्या हिंसाचारात काही गटांनी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात धक्कादायक माहिती SIT च्या (Special Investigation Team) तपासात पुढे आली आहे. या दंगली घडवण्यामागे काही बांग्लादेशी नागरिकांचा हात असल्याची माहिती SIT च्या हाली लागली आहे. शुक्रवारच्या नमाजानंतर सीमापुरी भागात दंगल उसळळी होती. या घटनेचा तपास SIT कडे सोपवण्यात आला होता. या दंगलखोरांमध्ये 15 जण बांग्लादेशी होते, असं त्यांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. दंगलखोरांविरोधात कारवाईला लवकरच सुरुवात होणार आहे. क्राईम ब्रँच या दंगलींसंदर्भात चौकशी करत आहे. 20 डिसेंबरला झालेल्या दंगलींमध्ये अटक करण्यात आलेल्या 55 आरोपींची चौकशी तिहार तुरुंगात जाऊन करण्यात येणार आहे. दिल्लीच्या दंगलींमध्ये इस्लामिक कट्टरपंथी संघटना PFI पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया च्या 15 कार्यकर्त्यांचा समावेश होता, ही गोष्टही तपासात पुढे आली आहे. या आरोपींचे कॉल डिटेल्स तपासले जात आहेत. त्यांची लोकेशन्स तपासली जात आहेत. ------------------------- अन्य बातम्या देवेंद्र फडणवीसांनी इगो बाजूला ठेवावा, काँग्रेसच्या मंत्र्यांचा सणसणीत टोला VIDEO : शिंगांसह फुटबॉल खेळू लागलं हरिण, गोल केल्यानंतर केलं भन्नाट सेलिब्रेशन! सावकरांविषयी काँग्रेसच्या वादग्रस्त 'बुकलेट'वर बंदी घाला, भाजपसह शिवसेनाही आक्रमक पॉर्न बघण्याच्या नशेत हिंसक होत आहेत भारतातील तरुण, धक्कादायक आकडेवारी समोर
    Published by:Arundhati Ranade Joshi
    First published:

    Tags: Bangladesh, Citizenship Amendment act, Delhi (Indian Union Territory)

    पुढील बातम्या