Home /News /mumbai /

सावरकरांबाबत काँग्रेसच्या वादग्रस्त पुस्तकावर बंदी घाला, भाजपसह शिवसेनाही आक्रमक

सावरकरांबाबत काँग्रेसच्या वादग्रस्त पुस्तकावर बंदी घाला, भाजपसह शिवसेनाही आक्रमक

भोपाळची घाण महाराष्ट्रात येणार नाही. ते पुस्तक अनधिकृत आहे, त्यावर बंदी आहे.

    मुंबई,3 जानेवारी:काँग्रेस सेवादलद्वारा (Congress Seva Dal) मध्य प्रदेशात एक वादग्रस्त पुस्तिकेचे (booklet)वितरण करण्यात आले आहे. या पुस्तिकेवरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथ्थूराम गोडसे आणि विनायक सावरकर यांच्या समलैंगिक संबंध असल्याचा दावा या पुस्तिकेत करण्यात आला आहे. यावरून भाजपसह शिवसेनेनेही काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेसे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन केली आहे. असे असताना शिवसेनेनेही काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला आहे. भोपाळची घाण महाराष्ट्रात येणार नाही. ते पुस्तक अनधिकृत आहे, त्यावर बंदी आहे. अशी पुस्तके तरीही वाटली जातात, भाजपच्या नेत्यांविषयीही वाटली गेली आहे. सावकरांविषयी कोणीही आम्हाला कुणी ज्ञान देण्याची गरज नाही. सावरकर देशाला प्रिय आहेत आणि यापुढेही राहतील, असे संजय राऊत यांनी ठणकावले आहे. दुसरीकडे, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. सावरकर यांची बदनामी करणाऱ्या पुस्तिकेवर महाराष्ट्रात बंदी घाला, अशी मागणी भाजपने केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत अतिशय घाणेरडे लिखाण असलेली पुस्तिका काँग्रेस पक्षाने वितरित करून आपल्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडवले असल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ही त्या पक्षाची बौद्धिक आणि मानसिक दिवाळखोरी आहे. या अशा दिवाळखोर पक्षाशी अनैसर्गिक आघाडी केलेली शिवसेना तीव्र निषेध नोंदवून या पुस्तकावर महाराष्ट्रात बंदी घालणार, की केवळ सत्तेसाठी आपल्या आराध्यांचे असे अपमान वारंवार सहन करणार असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारतीय जनता पक्ष या पुस्तकाचा तीव्र निषेध करते. हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात असते, तर पहिली प्रतिक्रिया त्यांनीच आपल्या खास शैलीत दिली असती. मात्र, आज तशी अपेक्षा करता येत नसली तरी या पुस्तकावर तत्काळ बंदीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी आम्हाला अपेक्षा आहे. संजय राऊत यांनी ठणकावलं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले,भोपाळमधले काँग्रेसचे गोपाळराव कोण आहेत माहीत नाही. पण शिवसेनेने अनेकदा भूमिका स्पष्ट केली आहे तरीही आपण वारंवार का विचारता? वीर सावरकर आमच्यासाठी महान होते आहेत आणि राहतील त्यांच्यावरची आमची श्रद्धा अशा प्रकारच्या फालतू पुस्तकाने कमी होणार नाही, भोपाळची घाण महाराष्ट्रात येणार नाही. ते पुस्तक अनधिकृत आहे, त्यावर बंदी आहे. अशी पुस्तके तरीही वाटली जातात, भाजपच्या नेत्यांविषयीही वाटली गेली आहे. सावकरांविषयी कोणीही आम्हाला कुणी ज्ञान देण्याची गरज नाही. सावरकर देशाला प्रिय आहेत आणि यापुढेही राहतील, असे संजय राऊत यांनी ठणकावले आहे. नितीन गडकरींचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा.. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर टीका करताना थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने आपल्या विचारसरणीशी तडजोड केली आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना केवळ सत्तेसाठी एकत्र आल्या आहेत. शिवसेना केवळ 'भगवा' असल्याचे भासवते. पण प्रत्यक्षात ती आता कॉंग्रेसच्या रंगात रंगली आहे, अशा शब्दांत गडकरींनी शिवसेनेवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंकडे मागणी.. भाजपा नेते, माजी शिक्षणमंत्री आमदार अँड. आशिष शेलार यांनी काँग्रेसच्या या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. काँग्रेसच्या सेवादलाकडून भोपाळमध्ये सावरकर यांची बदनामी करणारी पुस्तिका वाटण्यात आली आहे. आज सोशल मीडियामुळे अशा गोष्टी झपाट्याने पसरतात व ही पुस्तिका महाराष्ट्रात पोहचायला वेळ लागणार नाही. ही बाब सावरकर प्रेमींमध्ये संतापाची लाट पसरवणारी असून भाजपतर्फे आम्ही याचा अत्यंत तीव्र शब्दात निषेध करतो. महाराष्ट्रात ही पुस्तिका वितरित होऊ नये यासाठी त्यावर तातडीने महाराष्ट्र सरकारने बंदी आणावी. तसा प्रयत्न करणाऱ्यांवर तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Latest news, Sanjay raut, Shiv sena

    पुढील बातम्या