जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / असे आहेत राज्यातले मतदार, पावणे 2 कोटी युवा मतदार ठरवणार नवीन सरकार

असे आहेत राज्यातले मतदार, पावणे 2 कोटी युवा मतदार ठरवणार नवीन सरकार

असे आहेत राज्यातले मतदार, पावणे 2 कोटी युवा मतदार ठरवणार नवीन सरकार

मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज, मतदान कसं करता येणार वाचा सविस्तर.

  • -MIN READ
  • Last Updated :

प्रफुल्ल साळुंखे (प्रतिनिधी)मुंबई, 20 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली असून लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मतदारांची संख्या 2 लाखानं वाढ झाली आहे. राज्यात जवळपास 9 कोटी मतदार मतदानाच्या माध्यमातून २८८ आमदारांचं भवितव्य ठरवणार आहेत. यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे एक कोटी 71 लाख तरुण मतदारांचं मतदान निर्णायक ठरणार आहे. सोमवारी राज्यात विधानसभेसाठी मतदान होणार आहे. एकूण मतदार- 9 कोटी पुरुष मतदार- 4 कोटी 68 लाख 75 हजार 750 महिला मतदार- 4 कोटी 28 लाख 43 हजार 635 दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार सेवार्थी कर्मचारी- 1 लाख 17 हजार 581 तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 असे एकूण 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार मतदानाचा हक्क 21 ऑक्टोबरला बजावणार आहे. एकूण 96 हजार 661 मतदान केंद्रावर मतदान पार पडणार असून त्यापैकी 2 हजर 747 मतदान केंद्र संवेदनशील घोषीत करण्यात आले आहेत. 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र (बॅलेट युनिट), 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट) तर सुमारे 1 लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्र उपलब्ध करण्यात आले आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पारपाडण्यासाठी 6.50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मतदानादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 4 लाख पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. विशेष म्हणजे यंदा पोलीस कर्मचाऱ्यांच्या संखेत वाढ करण्यात आली आहे.निवडणूक आयोगानं मतदानासाठी सर्व तयारी केली असून मतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवात हिरारीनं सहभाग नोंदवण्याची आवश्यकता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात