जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Andheri East Bypoll : अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपची माघार, 'ज्येष्ठ' पवारांनी टोचले ठाकरेंच्या शिलेदारांचे कान

Andheri East Bypoll : अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपची माघार, 'ज्येष्ठ' पवारांनी टोचले ठाकरेंच्या शिलेदारांचे कान

Andheri East Bypoll : अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपची माघार, 'ज्येष्ठ' पवारांनी टोचले ठाकरेंच्या शिलेदारांचे कान

andheri east bypoll election अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून भाजपने उमेदवार मागे घेतला, यानंतर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या नेत्यांचे कान टोचले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17 ऑक्टोबर : अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून भाजपने त्यांचा उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्वची ही पोटनिवडणूक होत आहे. रमेश लटकेंना श्रद्धांजली म्हणून भाजपने उमेदवारी मागे घ्यावी, असं पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं, त्यानंतर शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेऊन अशीच भूमिका मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांची विधानसभेवर बिनविरोध निवड व्हावी, अशी मागणी केली. जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांनी मागणी केल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपने त्यांचा उमेदवार मागे घेतला, यानंतरही शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांकडून भाजपवर टीका करण्यात आली. भाजपला पराभव दिसत असल्यामुळे त्यांनी माघार घेतल्याचं शिवसेना नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, तर मुरजी पटेल हे खोटं प्रमाणपत्र दिल्यामुळे बाद झालेले उमेदवार होते, याची सगळ्यांना कल्पना आली होती, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. अटकेत असलेल्या संजय राऊत यांनीही भाजपचा पराभव होणार असल्यामुळे त्यांनी अर्ज मागे घेतल्याची प्रतिक्रिया दिली. अंधेरीतून भाजपने माघार का घेतली? सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शिवसेना नेत्यांचे अप्रत्यक्षपणे कान टोचले आहेत. ‘अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल याची मला खात्री होती. अखेर आज भाजपाने या निवडणुकीतून माघार घेतली. हा निर्णय स्वागतार्ह आहे. याचा मला आनंद आहे. एकदा त्यांनी माघार घेतली आहे त्यावर शंका किंवा इतर काही बोलणे योग्य नाही’, असं शरद पवार म्हणाले आहेत.

जाहिरात

‘ही पोटनिवडणूक आहे. रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे ही निवडणूक होत आहे. त्यांच्या पत्नीला जागा मिळणार अशी शक्यता होती. आधी निर्णय घेतला असता तर फायदा झाला असता का, तर निर्णय आता झाला किंवा आधी झाला, यापेक्षा निर्णय घेतला हे महत्त्वाचे आहे,’ अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. भाजपने पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, अशी मागणी रविवारी शरद पवारांनी केली होती. शरद पवारांच्या या मागणीचं उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं. शरद पवार ज्येष्ठ नेत असून त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा दाखवला. शिवसेना कुटुंब त्यांच्या बद्दल सदैव आभारी राहील, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. भाजप किती मतांने पराभूत होणार होती, संजय राऊतांनी कोर्टातून सांगितला आकडा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात