महाराष्ट्राचं राजकारण ज्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही ते नाव म्हणजे शरद पवार. (Sharad Pawar) मुरब्बी, द्रष्टे, कृषिप्रश्नाची उत्तम जाण असलेले, प्रशासनावर पकड असलेले आणि जनमानसात आदराचं स्थान असलेले राजकीय नेते म्हणजे शरद पवार. ते सत्तेत असोत किंवा नसोत, महाराष्ट्राचं राजकारण त्यांच्याभोवती फिरतं असं म्हटलं जातं.
शरद गोविंदराव पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी पुणे जिल्ह्यात बारामतीमध्ये (Baramati) झाला. त्यांच्या आई शारदाबाई 1938 मध्ये पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या शिक्षण समितीच्या प्रमुख होत्या, तर वडील बारामतीतल्या सहकारी बँकेचे पहिले व्यवस्थापक होते. कॉलेजमध्ये असताना तत्कालीन