आलियासोबतच्या किसिंगला घाबरला सलमान, 'इंशा अल्लाह'मधून घेतली माघार!

आलियासोबतच्या किसिंगला घाबरला सलमान, 'इंशा अल्लाह'मधून घेतली माघार!

सुरुवातीला असा रिपोर्ट समोर आला होता की, संजय लीला भन्साळी यांनी हा सिनेमा सध्या न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता भन्साळी यांनी सलमानशिवाय पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 16 सप्टेंबर- सलमान खान (Salman Khan) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) 'इंशा अल्लाह' सिनेमातून पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटायला येणार होते. प्रेक्षक या दोघांची केमिस्ट्री पाहण्यास उत्सुक होते. मात्र आता  भाईजानने हा सिनेमा सोडला आहे. सुरुवातीला क्रिएटिव मतभेदामुळे सलमानने सिनेमा सोडल्याचं म्हटलं जात होतं. पण आता एक वेगळंच कारण समोर येत आहे. रिपोर्टनुसार, किसिंग सीनमुळे सलमानने सिनेमा सोडल्याची चर्चा बी- टाउनमध्ये होत आहे.

Koimoi ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, 'इंशा अल्लाह' सिनेमाच्या संहितेनुसार सलमान आणि आलियामध्ये लिप लॉक सीन होता. सलमानने त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये कधीही लिप लॉक सीन केला नाही. सलमानने भन्साळी यांना याबद्दल सांगून सीन काढून टाकण्यास सांगितले. मात्र भन्साळींनी हा सीन काढून टाकण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळेच सलमानने सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतला.

शाहरुख किंवा हृतिकच्या नावाचा विचार-

सलमानने सिनेमातून काढता पाय घेतल्यानंतर भन्साळी यांनी शाहरुखला या सिनेमासाठी विचारले. शाहरुखनंतर हृतिकचं नाव यात समोर येत आहे. पण अजूनपर्यंत कोणतीही गोष्ट स्पष्ट झाली नाही. सुरुवातीला असा रिपोर्ट समोर आला होता की, संजय लीला भन्साळी यांनी हा सिनेमा सध्या न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता भन्साळी यांनी सलमानशिवाय पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे सिनेमाच्या प्री- प्रोडक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे सिनेमाचं चित्रीकरण पूर्णपणे रद्द करणं चुकीचं ठरेल.

श्वेता तिवारीच्या मुलीचा पलकचा बाथरूम VIDEO होतोय VIRAL

पंतप्रधानांना धमकी देणारी PAK गायिका म्हणाली 'पाकिस्तानातही आहेत मोदींचे चाहते

'वर्ल्ड रेकॉर्ड' केलेल्या या असामान्य व्यक्तीची भूमिका साकारणार विद्या बालन!

महाराष्ट्रीय पद्धतीने लग्न करणार नेहा पेंडसे, हनीमूनचे सांगितले खास प्लॅन...म्हणून अचानक चर्चेत आले आलिया भट्टचे सँडल, किंमत ऐकून बसेल धक्का!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2019 05:45 PM IST

ताज्या बातम्या