पंतप्रधानांना धमकी देणारी PAK गायिका म्हणाली- 'पाकिस्तानातही आहेत मोदींचे चाहते'

पंतप्रधानांना धमकी देणारी PAK गायिका म्हणाली- 'पाकिस्तानातही आहेत मोदींचे चाहते'

भारताचे तुमच्यासोबतचे संबंध खरंच चांगले आहेत. मी कधीही भारतीयांबद्दल वाईट बोलले नाही. फक्त मोदींबद्दल वाईट बोलते.

  • Share this:

मुंबई, 16 सप्टेंबर- पाकिस्तानी (Pakistani) पॉप सिंगर रबी पीरजादाला (Rabi Pirzada) पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) धमकावणं महागात पडू शकतं असंच वाटत आहे. जम्मू- काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानातील नेत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी याचा कडाडून विरोध केला. पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी तर चक्क अणुयुद्धाचीच धमकी दिली होती. देशाच्या पंतप्रधानांनीच अशा धमक्या दिल्यावर इतर लोक तरी कसे मागे राहतील. पाकिस्तानी पॉप सिंगर रबी पीरजादाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकी देण्याचा आगाऊपणा केला होता.

मोदींना धमकी देण्यासाठी पाकिस्तानी पॉप स्टार रबीने तिच्या ब्यूटी सलूनमध्ये चक्क साप आणि अजगर आणून ठेवत एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील वन्यजीव संरक्षण आणि उद्यान विभागाने रबी पीरजादाला नोटीस पाठवली असून तिच्याविरोधात आता कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. रबी विरोधात स्थानिक न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.

काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर रबी पीरजादानं अजगरासह अनेक सापांसोबतचा व्हिडिओ शूट केला होता. यात तिने मोदींना धमकी दिली होती की, 'मी एक काश्मिरी महिला, भारतासाठी सापांसह तयार आहे. ही भेट खरंतर मोदींसाठी आहे.' रबी पीरजादानं शेअर केलेल्या व्हिडीओत अजगर आणि मगरीही दिसत होत्या. दरम्यान एक नव्हा व्हिडीओ शेअर करून तिने भारत आणि मोदींविरोधातला राग व्यक्त केला आहे.

यात रबीने सांगितले की, पहिल्या व्हिडीओमध्ये जे साप आणि अजगर दाखवण्यात आले होते ते तिचे नाहीत. ते ती दुसऱ्यांकडून घेऊन व्हिडीओ आणि शोमध्ये दाखवते. यामुळे त्या गरीबांनाही पैसे मिळतात. या व्हिडीओमध्ये तिने म्हटलं की, '5 वर्षांपासून या सापांसोबत अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये जात आहे. तेव्हा तर कोणी काही बोललं नाही. कोणती कारवाई केली नाही. पण जेव्हा मी मोदींना धमकी दिली आणि त्यांना घाबरवलं तेव्हा माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तुम्ही जर पाकिस्तानावर प्रेम करू शकत नाहीत तर किमान विश्वासघात तरी करू नका.'

वृत्तवाहिन्यांवर काढला राग-

यावेळी रबी पीरजादाने तिचा सर्व राग वृत्त वाहिन्यांवर काढत म्हणाली की, 'माझा तोच व्हिडीओ का दाखवला ज्यात मी मोदींबद्दल बोलत आहे. भारताचे तुमच्यासोबतचे संबंध खरंच चांगले आहेत. मी कधीही भारतीयांबद्दल वाईट बोलले नाही. फक्त मोदींबद्दल वाईट बोलते. वन्यजीव विभाग हा असाच विश्वासघातकी आहे.' रबी पुढे म्हणाली की, अजूनपर्यंत तिला लिखित स्वरुपात कोणतंही पत्र मिळालेलं नसून जेव्हा तिला मिळेल तेव्हा ती विभागावरच कारवाई करेल.

...म्हणून अचानक चर्चेत आले आलिया भट्टचे सँडल, किंमत ऐकून बसेल धक्का!

महाराष्ट्रीय पद्धतीने लग्न करणार नेहा पेंडसे, हनीमूनचे सांगितले खास प्लॅन

'वर्ल्ड रेकॉर्ड' केलेल्या या असामान्य व्यक्तीची भूमिका साकारणार विद्या बालन!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2019 01:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading