जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / श्वेता तिवारीच्या मुलीचा बाथरूम VIDEO होतोय VIRAL

श्वेता तिवारीच्या मुलीचा बाथरूम VIDEO होतोय VIRAL

श्वेता तिवारीच्या मुलीचा बाथरूम VIDEO होतोय VIRAL

पलकने तिचे सावत्र वडील आणि श्वेता तिवारीचा नवरा अभिनव कोहलीवर मारहाण केल्याचा आरोप केला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 सप्टेंबर- टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिची मुलगी पलक तिवारी काही दिवसांपूर्वी कौटुंबिक वादामुळे चर्चेत आले होते. पलकने तिचे सावत्र वडील आणि श्वेता तिवारीचा नवरा अभिनव कोहलीवर मारहाण केल्याचा आरोप केला होता. पलक तिवारी सोशल मीडियावर फार सक्रीय असून तिचा स्वतंत्र चाहता वर्ग आहे. सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीच तिचे सोशल मीडियावर असंख्य चाहते आहेत. एवढंच नाही तर तिच्या स्टायलिश लुकमुळे पलकने स्टार किड्सच्या मांदियाळीत आपली जागा पक्की केली आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही पलकचा इन्स्टाग्रामचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तिने बाथरूममध्ये शेअर केला आहे. यात पलक आरशासमोर उभी राहून पोज देताना दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना तिने लिहिले की, ‘या पोजला उल्टा पुल्टा हेअर असं म्हणतात.’ पलक हेही म्हणाली की तिने हा व्हिडीओ बाथरूममध्ये शेअर केला आहे. अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.

जाहिरात

गेल्यावर्षीच पलक बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. पण, आई श्वेता तिवारीच्या सांगण्यावरून तिने अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. आता असं म्हटलं जात आहे की पुढच्या वर्षी तारे जमीन पर फेम दर्शील सफारीसोबत ती बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कसौटी जिंदगी की-2 मधून पलक डेब्यू करू शकते. पण वास्तवात असं काही झालं नाही. पलकला स्वतःला टीव्हीआधी सिनेमांमध्ये आपलं नशीब आजमावू इच्छिते. …म्हणून अचानक चर्चेत आले आलिया भट्टचे सँडल, किंमत ऐकून बसेल धक्का! महाराष्ट्रीय पद्धतीने लग्न करणार नेहा पेंडसे, हनीमूनचे सांगितले खास प्लॅन ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ केलेल्या या असामान्य व्यक्तीची भूमिका साकारणार विद्या बालन! पंतप्रधानांना धमकी देणारी PAK गायिका म्हणाली ‘पाकिस्तानातही आहेत मोदींचे चाहते

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात