मुंबई, 16 सप्टेंबर- ‘मिशन मंगल’ सिनेमानंतर आता अभिनेत्री विद्या बालन नव्या सिनेमाच्या कामात गुंतली आहे. गणिताची जादूगार शकुंतला देवी यांच्या जीवनावर आधारीत सिनेमाचा टीझर आणि सिनेमातील विद्याचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ‘शकुंतला देवी- ह्युमन कॉम्प्युटर’ असं विद्याच्या या नव्या सिनेमाचं नाव आहे. विद्याने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा टीझर शेअर केला. टीझरमध्ये शकुंतला देवी यांचा परिचय देण्यात आला आहे. सर्वसामान्य विद्या तिच्या सिनेमांमध्ये साडी, ड्रेस किंवा सलवार सूटमध्ये दिसते. मात्र या सिनेमात तिचा लुक थोडा वेगळा असणार आहे. बॉब हेअरकट आणि साडीत विद्या शकुंतला देवी यांच्यासारखीच दिसत आहे. कोण आहेत शकुंतला देवी- शकुंतला देवी या भारतीय लेखिका आणि मेंटल कॅलक्युलेटर होत्या. डोक्यातच सर्व काही कॅलक्युलेट करण्याची अद्वितीय क्षमता त्यांच्याकडे होती. त्या मानवी कॉम्प्युटर नावाने प्रसिद्ध होत्या. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्यांच्या नावाचा उल्लेख आहे.
She was extraordinary, in every sense of the word! Know the story of the child prodigy & the human computer, #ShakuntalaDevi
— vidya balan (@vidya_balan) September 16, 2019
@sonypicsprodns @Abundantia_Ent @anumenon1805 @vikramix @SnehaRajani pic.twitter.com/P2PAqPp5Tt
अनु मेनन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाबद्दल बोलताना अनु म्हणाल्या की, शकुंतला देवींचा त्यांच्यावर नेहमीच प्रभाव राहिला. त्या एक अद्वितीय महिला होत्या. त्या वेळेच्या पुढे आणि स्वतःच्या तत्त्वांवर चालायच्या. ‘मिड- डे’ला दिलेल्या एका मुलाखतीत विद्याने शकुंतला देवी यांच्या बायोपिकबद्दल सांगताना म्हटलं की, ‘मला त्यांच्या आकर्षक पर्सनॅलिटी आणि आयुष्य जगण्याने आकर्षित केलं.’
विद्याचा याआधीचा सिनेमा ‘मिशन मंगल’ अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. विद्यासह अक्षय कुमार, तापसी पन्नू, कीर्ति कुल्हारी, नित्या मेनन, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात होती. यात विद्याने शास्त्रज्ञाची भूमिका साकारली होती. महाराष्ट्रीय पद्धतीने लग्न करणार नेहा पेंडसे, हनीमूनचे सांगितले खास प्लॅन …म्हणून अचानक चर्चेत आले आलिया भट्टचे सँडल, किंमत ऐकून बसेल धक्का!