मुंबई, 21 सप्टेंबर- : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं हृदयविकाराचा झटक्यानं निधन झालं. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. विनोदाच्या दुनियेत आपली छाप पाडून नवी ओळख निर्माण करणाऱ्या राजू श्रीवास्तव यांच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आपल्या स्टँडअप कॉमेडीनं प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या राजू श्रीवास्तव यांनी अनेक आयकॉनिक भूमिका निभावल्या ज्यामुळे ते प्रेक्षकांच्या गळ्यात ताईत बनले. प्रेक्षक आजही राजू श्रीवास्तव यांचे चाहते आहेत. 58 वर्षीय राजू श्रीवास्तव त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष द्यायचे मात्र जीममध्ये व्यायाम करतेवेळीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्याची कहाणी नेहमी कशी होती आणि त्याचं नेटवर्थ किती आहे जाणून घ्या.
मेहनती राजू श्रीवास्तव
राजू श्रीवास्तव उत्तर प्रदेशमध्ये वास्तव्यास होते. शुटींगसाठी ते मुंबईमध्ये राहत होते. त्यांच्या जन्म मध्यवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणापासूनच घरची हालाकीची परिस्थिती ते पाहत आले आहेत. त्यामुळे पहिल्यांपासूनच चिकाटी त्यांच्या अंगी होती. आपल्या तगड्या मेहनतीनं त्यांनी सिनेसृष्टीत नाव कमावलं. राजू श्रीवास्तव यांच्याकडे आज आलिशान घर आहे. अभिनेता लग्झरियस आयुष्य जगत होते.
हेही वाचा - राजू श्रीवास्तव यांनी आधीच केला होता यमराजचा उल्लेख
वडिलांकडून मिळाला होता वारसा
राजू श्रीवास्तव यांना कलेचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला. त्यांचे वडील रमेश चंद्रा श्रीवास्तव हे कवी होते. राजू लहानपणापासून मिमिक्री करायचे. कलेची त्यांना विशेष आवड होती. लहानपणापासूनच त्यांना एक कॉमेडियनच व्हायचं होतं. टीव्ही शो, कॉमेडी शो अवॉर्ड होस्ट करण्यापासून त्यांची सुरुवात झाली. मीडिया रिपोर्टनुसार राजू श्रीवास्तव एका कॉमेडी शोसाठी लाख रुपये चार्ज करत. सध्या त्यांच्याकडे 15-20 करोडोची संपत्ती आहे. पण तरीही त्यांचं एक स्वप्न अपूर्णच राहिलं.
जगभर केले कॉमेडी शो
राजू श्रीवास्तव संपूर्ण जगभर कॉमेडी शो करत होते. त्याचप्रमाणे त्यांनी आपली ऑडिओ व्हिडीओ सीरिजही काढली. आजवर त्यांनी अनेक जाहिरातीतही काम केलं. एका जाहिरातीसाठीही ते लाखांमध्ये मानधन घेत होते. महानायक अमिताभ बच्चन यांची मिमिक्री करण्यासाठी राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध आहेत. स्ट्रगलच्या काळात त्यांनी बिग बींची मिमिक्री करुन पैसे कमावले होते. टीव्ही शो, मिमिक्री, जाहीरातीत काम करुन पैसे कमावणाऱ्या राजू श्रीवास्तव यांचे यूट्यूबरही सर्वाधिक सब्स्क्राइबर्स आहेत. युट्यूबकडूनही त्यांना पैसे मिळतात.
लग्झरी कारचे होते शौकिन
राजू श्रीवास्तव लग्झरी कारचे शौकिन होते. त्यांच्याकडे ऑडी Q7 कार आहे. ज्याची शोरुम किंमत जवळपास 90 लाख रुपये आहे. त्यांच्याप्रमाणे त्यांच्याकडे 3 BMW कारही आहेत. ज्यांची शोरुम किंमत 40 लाख रुपये आहे.
राजू श्रीवास्तव यांनी 1993मध्ये लग्न केलं. शिखा श्रीवास्तव असं त्यांच्या पत्नीचं नाव असून त्यांना दोन मुलं आहे. मुलाचं नाव आयुष्मान आहे तर मुलीचं नाव अंतरा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News