मुंबई, 21 सप्टेंबर : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची झुंज अखेर अपयशी ठरली. राजू श्रीवास्तव यांचे 21 सप्टेंबर रोजी सकाळी निधन झालं ते 58 वर्षांचे होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. हृदयविकाराच्या समस्येमुळे त्यांना बराच काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . कधी त्यांची प्रकृती सुधारत होती तर कधी बिघडत होती पण आता 21 सप्टेंबर रोजी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिन्यात 10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राजूच्या या अवस्थेबद्दल त्याचे चाहतेही खूप नाराज झाले होते. डॉक्टरांची मोठी टीम त्यांच्यावर उपचार करत होती. चाहतेही त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते मात्र आज अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला. या दु:खद घटनेदरम्यान त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी आधीच यमराज आणि मृत्यूचा उल्लेख केला आहे. राजू यांचा हा व्हिडिओ खूप जुना आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणत आहे कि, ‘‘नमस्कार, आयुष्यात असे काम करा की यमराज जरी तुम्हाला न्यायला आला तरी त्याला सांगा तू म्हशीवर बस. आपण चालत आहात, बरे वाटत नाही. तू चांगला माणूस आहेस, थोर माणूस आहेस, म्हणून तुम्ही म्हशीवर बसा.’ त्यांचा हा व्हिडीओ कॉमेडी अंदाजात केलेला जरी असला तरी लोक आता हा व्हिडीओ पाहून त्यांची आठवण काढत आहेत.
राजू श्रीवास्तव यांचा जन्म 25 डिसेंबर 1963 रोजी कानपूरमध्ये झाला होता. कॉमेडियनचे खरे नाव सत्य प्रकाश श्रीवास्तव आहे. त्यांच्या वडिलांचे नाव रमेशचंद्र श्रीवास्तव आणि आईचे नाव सरस्वती श्रीवास्तव होते. राजूचे वडील सुप्रसिद्ध कवी होते, जे बाळा काका या नावाने प्रसिद्ध होते. तर आई गृहिणी होती. 1993 मध्ये राजूचे शिखा श्रीवास्तवसोबत लग्न झाले होते. राजूला दोन मुले आहेत. एक मुलगा, ज्याचे नाव आयुष्मान आणि मुलगी अंतरा. हेही वाचा - Raju Srivastava : मृत्यूलाही चकवा देऊन राजू आला होता परत, ‘हे’ शब्द ठरले अखेरचे! 10 ऑगस्ट रोजी जेव्हा राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्यांना पाहण्यासाठी लोकांची एकच ओढ लागली होती. त्याचे मित्र आणि कुटुंबीय सतत राजूला भेटायला जात होते आणि प्रत्येकजण त्याच्या प्रकृतीबद्दल अपडेट्स देत होता. त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाल्याचेही अनेकांनी सांगितले पण आता राजूने आयुष्याची लढाई हरली आणि जगाचा निरोप घेतला आहे.