मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

भावाच्या लग्नात जडलं प्रेम, 12 वर्षे केली प्रतीक्षा; फिल्मी आहे राजू श्रीवास्तव यांची Love Story

भावाच्या लग्नात जडलं प्रेम, 12 वर्षे केली प्रतीक्षा; फिल्मी आहे राजू श्रीवास्तव यांची Love Story

  प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्यावर गेल्या 41 दिवसांपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु होतं. परंतु त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 21 सप्टेंबर-   प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्यावर गेल्या 41 दिवसांपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु होतं. परंतु त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. हार्ट अटॅक आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी राजू श्रीवास्तव यांचं निधन झालं आहे. त्यानंतर त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी लोक धडपड करत आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात पत्नी शिखा, मुलगा, मुलगी आणि भाऊ असा मोठा कुटुंब आहे.

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या व्यावसायिक आयुष्याबाबत सर्वानाच माहिती आहे. परंतु त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे. राजू श्रीवास्तव आपल्या खाजगी आयुष्याला नेहमीच लाइमलाईटपासून दूर ठेवत असत. आज आपण त्यांची लव्हस्टोरी पाहणार आहोत. राजू श्रीवास्तव यांची लव्हस्टोरी आणि लग्न एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाहीय. त्यांनी तब्बल 12 वर्षे आपल्या प्रेमाची प्रतीक्षा केली आहे.

राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीचं नाव शिखा असं आहे. राजू श्रीवास्तव यांनी शिखाला पहिल्यांदा आपल्या भावाच्या लग्नाच्या वरातीत पाहिलं होतं. हे लग्न फतेहपूरमध्ये होतं. शिखा यांना पाहताच क्षणी राजू त्यांच्या प्रेमात पडले होते. त्याचवेळी राजूंनी शिखाशी लग्न करण्याचा मनोमनी निश्चय केला होता. त्यानंतर त्यांनी शिखा यांची माहिती काढायला सुरुवात केली. त्यांना समजलं की त्या त्यांच्या भावाच्या बायकोची चुलत बहीण आहे. अर्थातच भावाची चुलत मेहुणी आहे.

(हे वाचा:50 रुपयात करायचे शो, ऑटो ड्रायव्हर ते गजोधर भैया राजू श्रीवास्तव यांचा प्रवास फारच रंजक )

राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या भावांशी संबंध वाढवले. आणि शिखाचं मूळ गाव इटावा याठिकाणी येन जण वाढवलं. एका मुलाखतीदरम्यान राजू श्रीवास्तव यांनी सांगितलं होतं कि,त्यांचं लग्न इतक्या सहजा-सहजी झालेलं नव्हतं तर त्यांना लग्नासाठी तब्बल १२ वर्षे प्रतीक्षा करावी लागली होती. राजू श्रीवास्तव यांनी 1993 मध्ये शिखा यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहे. मुलाचं नाव आयुष्मान आहे तर मुलीचं नाव अंतरा आहे.

First published:

Tags: Comedian