मुंबई, 21 सप्टेंबर : आज म्हणजे 21 सप्टेंबरला कॅमेडी किंग राजू श्रीवास्तव यांनी AIIMS रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या घटनेनं मनोरंजन विश्वास शोककळा पसरली. लोकांनी देखील एक चांगला कॉमेडी किंग गमावला. अखेर सगळ्यांना हसवणारा राजू सर्वांना रडवून गेला. खरंतर जेव्हा राजू श्रीवास्तव रुग्णालयात दाखल झाले तेव्हापासूनच अनेक लोक त्यांच्या बरं होण्यासाठी प्रार्थना करत होते. पण ते सगळं व्यर्थच ठरलं आणि अखेर त्यांनी आपले प्राण सोडले.
पण नक्की राजू श्रीवास्तव यांना काय झालं होतं असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. चला जाणून घेऊयात त्याच्या अखेरच्या काही दिवसांचा प्रवास.
10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये अचानक हार्ट अटॅक आला, जिममध्ये वर्कआउट करत होते तेव्हा ते ट्रेडमिलवरुन खाली कोसळले. ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ज्यानंतर त्यांची प्रकृती फारच गंभीर होती. त्यांनी काही दिवस तर आपले डोळे देखील उघडले नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी राजू हे ब्रेनडेडच्या स्थितीत असल्याचं सांगितलं. पण त्यांचे मॅनेजर मकबूल यांनी श्रीवास्तव ब्रेनडेड असल्याचं वृत्त फेटाळलं आहे.
हे वाचा : Raju Srivastava Death: राजू श्रीवास्तव यांचं शेवटचं स्वप्न अपूर्णच; करायचं होतं 'हे' काम
परंतू मधल्या काळात राजू श्रीवास्तव यांची प्रकृती इतकी बिघडली की, डॉक्टर त्यांना कशाचाही संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेऊ लागले. अगदी त्यांच्या बायकोला आणि मुलीला देखील त्यांना भेटण्याची किंवा त्यांच्या खोलीत जाण्याची परवानगी नव्हती.
राजू यांच्या मेंदूतील एक नस पूर्णपणे ब्लॉक झाली आहे. मेंदू काम करण्यासाठी महत्त्वाच्या तीन नस असतात त्यातील एक नस ब्लॉक झाल्यानं राजू पूर्णपणे कोमामध्ये गेले आहेत. ज्यानंतर एम्सच्या न्यूरो विभागाच्या प्रमुख पद्मा श्रीवास्तव यांच्या देखरेखीखाली राजूवर उपचार सुरु होते.
हेही वाचा - राजू श्रीवास्तव यांच्याकडे होती एवढी संपत्ती
ज्यानंतर त्यांच्या परिस्थीतीत थोडाफार बदल जाणवला, ज्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं. परंतू त्यांना शुद्ध आली नव्हती. राजू यांच्या मानसिक स्वास्थामध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांना बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील गाणी डायलॉग्स ऐकवण्यात येत होते, अशी माहिती देखील त्यांच्या कुटुंबियांनी दिली.
ज्यानंतर 8 सप्टेंबर पर्यंत त्यांची प्रकृती सुधारली होती. पण काही दिवसातच त्यांना 100 डिग्री ताप आला, ज्यामुळे त्यांची परिस्थीती पुन्हा खालावली आणि त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं.
गेल्या 40 दिवसांपासून राजू श्रीवास्तव यांना शुद्ध आलेली नव्हती. त्यांच्या मेंदुपर्यंत ऑक्सिजन पोहचत नसल्यामुळे त्यांना शुद्ध आलेली नव्हती असं म्हटलं जात आहे.
त्याचा भाऊ दीपू यांच्या म्हणण्यानुसार, राजू यांच्या डॉक्टरांनी व्हेंटिलेटर काढण्यासाठी अनेकदा विचार केला, मात्र वारंवार त्यांना ताप येत असल्याने व्हेंटिलेटरचा सपोर्ट कायम ठेवण्यात आला होता.
अखेर त्यांची ही मृत्यूशी झूंज 21 सप्टेंबरला संपली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Comedy, Viral news