Home /News /entertainment /

कॉन्सर्ट सुरू असतानाच नाचता नाचता फाटली रणवीरची पँट; दीपिकाने काय केलं पाहा

कॉन्सर्ट सुरू असतानाच नाचता नाचता फाटली रणवीरची पँट; दीपिकाने काय केलं पाहा

दीपिका पदुकोणने स्वतःच एका शो दरम्यान रणवीरबरोबरचा हा मजेदार किस्सा सांगितला.

    मुंबई, 2 जानेवारी : अभिनेता रणवीर सिंह नेहमीच अतिउत्साहात वावरताना दिसतो. त्याच्या या अतिउत्साहाने कधीकधी अडचणीही आल्या असल्याचं पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण सांगते. तिने रणवीरचा एक भन्नाट किस्सा नुकत्याच एका कार्यक्रमादरम्यान सांगितला. एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये नाचत असताना अचानक रणवीरची पँय फाटली आणि मग आपण काय केलं, हे तिने सांगितलं. दीपिका तिच्या छपाक चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये आली होती. लवकरच हा एपिसोड प्रसारित होईल. या शोदरम्यान कपिल शर्माशी गप्पा मारताना दीपिकाने हा किस्सा सांगितला. मी नवऱ्याबरोबर फिरताना नेहमी माझ्या पर्समध्ये सेफ्टी पिन, सुई-दोरा घेऊनच फिरते. याचं कारण सांगताना दीपिकाने ही गोष्ट सांगितली. मुंबई मिररमध्ये आलेल्या बातमीनुसार, स्पेनमध्ये बार्सिलोना इथे एका म्युझिक फेस्टिवलमध्ये रणवीर सिंह डान्स करत होता. वाचा - OMG! दीपिकाचा 4BHK फ्लॅट असलेल्या बिल्डिंगमध्ये भाड्याने राहतो रणवीर काही विचित्र डान्स स्टेप करताना त्याची टाइट पँट अचानक टर्रकन फाटली. मग दुसरा काही इलाज नव्हता. माझ्या आसपास लोक डान्स करत होते आणि मी याची पँट शिवत होते. दीपिकाने या शोमध्ये रणवीरबद्दलच्या आपल्या नात्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. 2018 मध्ये या दोन स्टार्सनी इटलीत लग्न केलं होतं. त्या आठवणीसुद्धा दीपिकाने सांगितल्या. पाहा VIDEO बायको सांगत होती काम, नवरा होता फोनमध्ये बिझी नंतर काय झालं तुम्हीच पाहा दीपिकाचा छपाक हा चित्रपट पुढच्या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. या सिनेमात दीपिकाने अॅसिड अटॅक झालेल्या तरुणीची भूमिका केली आहे. या सिनेमाची ची निर्मातीही आहे. छपाकच्या माध्यमातून दीपिका पदुकोण पहिल्यांदाच निर्माती म्हणून पुढे येत आहे. ------------------------------ अन्य बातम्या 14 ऑगस्टलाच पाकिस्तानला धूर चारताना दिसणार मराठमोळा एअर फोर्स अधिकारी अजय देवगण सलमान खाननं एक्स गर्लफ्रेंडसोबत केलं New Year सेलिब्रेशन, PHOTO VIRAL तुम्ही भाड्याच्या घरात राहता का? मग असा बदला आधार कार्डवरचा पत्ता अहो फडणवीस, काहो फडणवीस, कसं हो फडणवीस? काँग्रेस नेत्याचं Tiktok स्टाईल उत्तर
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या