Home /News /money /

तुम्ही भाड्याच्या घरात राहता का? मग असा बदला आधार कार्डवरचा पत्ता

तुम्ही भाड्याच्या घरात राहता का? मग असा बदला आधार कार्डवरचा पत्ता

नव्या वर्षात जर तुम्हाला घर बदलायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळेच तुमचा लेटेस्ट पत्ता आधार कार्डवर जरूर अपडेट करा.

    नवी दिल्ली, 3 जानेवारी : नव्या वर्षात जर तुम्हाला घर बदलायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आधार कार्ड (Aadhar Card) चा वापर अॅड्रेस प्रूफ म्हणूनही केला जातो. त्यामुळेच तुमचा लेटेस्ट पत्ता आधार कार्डवर जरूर अपडेट करा. आधार कार्ड प्रसिद्ध करणारी UIDAI (UIDAI-Unique Identification Authority of India)ही संस्था व्हॅलिड प्रूफ दिल्यानंतर आधार कार्डचा पत्ता बदलण्याचा पर्याय देते. पण आता आधार कार्डाच्या सेल्फ सर्व्हिस पोर्टलवर सोप्या पद्धतीने पत्ता बदलता येतो. यासाठी तुम्हाला रेंट अग्रीमेंट द्यावं लागेल. आता रेंट अॅग्रीमेंट हेही ओळखपत्रासारखंच वापरलं जातं. योग्य ओळखपत्रांमध्ये पासपोर्ट, बँक पासबुक, स्टेटमेंट, व्होटर आयडी कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, टेलिफोन बिल, पाणी आणि वीजबिलाचाही समावेश आहे. Aadhaar ✔ @UIDAI #AadhaarUpdateChecklist If you are using Rent Agreement for Address update in Aadhaar, use a registered rent agreement that has your name. For online address update, scan the entire document and create a single pdf file to upload. पत्ता बदलताना लक्षात घ्या या गोष्टी सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या रेंट अॅग्रीमेंटची नोंदणी करा. जर तुमचं रेंट अॅग्रीमेंट रजिस्टर्ड नसेल तर UIDAI हे नाकारू शकतं. रेंट अॅग्रीमेंटचं प्रत्येक पान स्कॅन करून ते वेगवेगळं अपलोड करा. तुम्ही जर पूर्ण पान एकत्र अपलोड केलंत तर ते नाकारलं जाईल.हे सगळं करण्यासाठी UIDAI च्या https://uidai.gov.in/ या अधिकृत साइटवर जा. (हेही वाचा : आइस्क्रीमसाठी आता मोजावे लागणार जास्त पैसे, गारेगार हवेत खिशाला चटके) ==================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Aadhar card, Money

    पुढील बातम्या