मुंबई, 02 जानेवारी : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह बॉलिवूडमधलं सर्वाधिक चर्चेत राहणारं कपल आहे. सोसल मीडिया असो वा कोणतं फंक्शन दीपिका रणवीर नेहमीच एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात. पण नुकतीच या दोघांबद्दल आलेल्या एक वृत्तामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. रणवीरनं मुंबईच्या प्रभादेवी भागात एक फ्लॅट भाड्यानं घेतला आहे. विशेष म्हणजे रणवीरनं ज्या बिल्डिंगमध्ये हा फ्लॅट भाड्यानं घेतला आहे. त्याच बिल्डिंगमध्ये त्याची पत्नी दीपिकाचा 4 BHK फ्लॅट आहे. मग रणवीरवर भाड्यानं फ्लॅट घेण्याची वेळ का आली असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
इंडियन एक्सप्रेसनं रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या वृत्तानुसार रणवीरनं या बिल्डिंगमध्ये पूर्ण 3 वर्षांसाठी एक फ्लॅट भाड्यानं घेतला आहे. या फ्लॅटचं भाडं पहिल्या 2 वर्षांसाठी 7.25 लाख असणार आहे. यानुसार प्रत्येक महिन्याला रणवीरल 7 लाखांपेक्षा जास्त भाडं द्यावं लागणार आहे. तर तिसऱ्या वर्षी या भाड्यात वाढ होऊन 7.97 लाख एवढी रक्कम रणवीरला द्यावी लागणार आहे.
दीपिका आणि रणवीरनं 2018 मध्ये इटलीतील लोक कोमो येथे लग्न केलं होतं. नुकताच त्यांनी लग्नाचा पहिला वाढदिवसही साजरा केला. या दोघांच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर दीपिकाचा छपाक हा सिनेमा येत्या 10 जानेवारीला रिलीज होत आहे. तर रणवीरची मुख्य भूमिका असलेला 83 हा सिनेमा सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात रणवीर भारतीय माजी क्रिकेट कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.