Home /News /entertainment /

'भूज' चा फर्स्ट लुक आउट; 14 ऑगस्टलाच पाकिस्तानला धूर चारताना दिसणार मराठमोळा एअर फोर्स अधिकारी अजय देवगण

'भूज' चा फर्स्ट लुक आउट; 14 ऑगस्टलाच पाकिस्तानला धूर चारताना दिसणार मराठमोळा एअर फोर्स अधिकारी अजय देवगण

हवाई दल अधिकारी विजय कर्णिक यांच्या कामगिरीमुळे पाकिस्ताविरोधातल्या युद्धात भारताची सरशी होऊ शकली.

    मुंबई, 2 जानेवारी : अजय देवगणच्या 'भूज' (Bhuj: The Pride of India) चित्रपटाचा First Look रीलिज झाला आहे. 1971 च्या भारत- पाकिस्तान युद्धावर आधारित या चित्रपटात अजयने हवाई दलातले स्कॉड्रन लीडर विजय कर्णिक यांची भूमिका केली आहे. पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन 14 ऑगस्टलाच हा सिनेमा रीलिज होणार आहे, हे विशेष. अजय देवगण, संजय दत्त, राणा डग्गुबत्ती आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या भूज चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. भुजः द प्राइड ऑफ इंडिया (Bhuj: The Pride of India) या सिनेमात विजय कर्णिक नावाच्या हवाई दल अधिकाऱ्याची भूमिका अजय देवगण करत आहे. याच स्क्वॉड्रन लीडर विजय कर्णिक यांनी 1971 च्या युद्धात (Indo-Pak War) भारतासाठी मोठी कामगिरी बजावली होती. 1971 मध्ये भूजमध्ये पाकिस्तानने घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात अंदाधुंद गोळीबार केला होता. तिथली एअरस्पेस पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा पाकिस्तानचा डाव होता. असं झालं असतं तर भारताकडून प्रतिहल्ला होण्याची शक्यताच संपुष्टात आली असती. पण ही उद्ध्वस्त झालेली धावपट्टी विजय कर्णिक यांनी भूजच्या आसपास राहणाऱ्या 300 महिलांच्या मदतीने एका रात्रीत पुन्हा उभी केली. भारतीय हवाई दलाची विमानं या धावपट्टीवर सुरक्षित उतरली. विजय कर्णिक यांच्या कामगिरीमुळे पाकिस्ताविरोधातल्या युद्धात भारताची सरशी होऊ शकली. सेल्फी घेत असतानाच अर्जुन कपूरला मलायकाने केलं Kiss; पाहा PHOTO
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Ajay devgan

    पुढील बातम्या