सलमानच्या या पार्टीमध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. ज्यात सलमानच्या जवळच्या मित्रपरिवाराचा समावेश होता. या पार्टीत सलमानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी सुद्धा दिसली. सलमानच्या पनवेल फार्म हाऊसवरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले ज्यात सलमान आणि संगीता दिसत आहेत. पार्टी एन्जॉय केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती तिच्या मैत्रिणींसोबत वॉकसाठी गेलेली दिसली. तिच्यासोबत डेझी शाह आणि साजिद नाडियाडवालाची पत्नी वर्धा नाडियाडवाला ही सुद्धा होती. अभिनेत्री नीना गुप्तांचा 'हा' सिनेमा Oscar च्या शर्यतीत, ट्विटरवर लिहिलं...
तर दुसरीकडे सलमान खान फार्म हाऊसच्या लॉनवर फिरत फोनवर बोलताना स्पॉट झाला. पण सलमानच्या पार्टीचे इनसाइड फोटो अद्याप समोर आलेले नाहीत. सध्या सलमान खान खूप खूश आहे. कारण एकीकडे त्याच्या दबंग 3नं चांगली कमाई केली आहे तर दुसरीकडे सलमानची बहीण अर्पिता खाननं त्याच्या वाढदिवशीच गोंडस मुलीला जन्म देत त्याला एक गोड भेट दिली. 27 डिसेंबरला अर्पितानं सी सेक्शन डिलिव्हरीच्या मदतीनं मुलीला जन्म दिला. काय आहे हृतिक रोशनच्या फिटनेसचं रहस्य, जाणून घ्या त्याचा Diet Plan
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Salman khan