JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ind vs Pak: क्रिकेट चाहत्यांसाठी मेलबर्नमधून आली गुड न्यूज, भारत-पाक सामन्यात...

Ind vs Pak: क्रिकेट चाहत्यांसाठी मेलबर्नमधून आली गुड न्यूज, भारत-पाक सामन्यात...

Ind vs Pak: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी मेलबर्नच्या हवामानात अचानक बदल दिसून आला आहे. मेलबर्नमधून हाती आलेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी पाऊस न पडल्यानं आणि हवामानाचा बदलता मूड पाहता चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.

जाहिरात

मेलबर्नमधल्या वातावरणात बदल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मेलबर्न, 22 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट चाहत्यांना एक प्रश्न वारंवार सतावतोय तो म्हणजे टी20 वर्ल्ड कप मध्ये भारत आणि पाकिस्तान संघातला हाय व्होल्टेज मुकाबला होणार की नाही? सुपर 12 फेरीत ग्रुप 2 मध्ये पहिलाच सामना रंगणार आहे तो या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये. त्यासाठी दोन्ही टीम्स कसून सराव करत आहेत. पण याचदरम्यानं गेल्या काही दिवसांपासून मेलबर्नमध्ये पाऊस पडतोय आणि त्याच कारणामुळे या सामन्यावरही अनिश्चिततेचे ढग दाटून आले होते. पण या सामन्याआधी थेट मेलबर्न मधून टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. कारण आज दिवसभर मेलबर्नमध्ये पाऊस पडलेला नाही. हवामानाचा बदलता ‘मूड’ भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी मेलबर्नच्या हवामानात अचानक बदल दिसून आला आहे. मेलबर्नमधून हाती आलेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी पाऊस न पडल्यानं आणि हवामानाचा बदलता मूड पाहता चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्यानुसार रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ब्लॉकबस्टर सामन्याच्या दिवशी 60 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्लेईंग इलेव्हनबाबत अजून खुलासा नाही दरम्यान हवामानाच्या अनिश्चिततेमुळे दोन्ही संघांनी आपल्या प्लेईंग इलेव्हनबाबत कोणतीही अपडेट दिलेली नाही. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मानेही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत आपल्या प्लेईंग इलेव्हनचा खुलासा केलेला नाही. मॅचआधी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितनं म्हटलं की, ‘मेलबर्नमध्ये हवामान दर मिनिटाला बदलत आहे. उद्या सकाळी असलेल्या परिस्थितीनुसार आम्ही आमची प्लेईंग इलेव्हन ठरवू. कारण आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत थांबावं लागेल.’ दोन्ही संघ सरावात व्यस्त दरम्यान भारत आणि पाकिस्ताननं सामन्याआधी चांगलाच सराव केला.

हेही वाचा -  T20 World Cup: गौतम गंभीरनं निवडली पाकिस्तानविरुद्धची प्लेईंग XI, पंत-कार्तिकपैकी कुणाला दिली संधी? भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, रवीचंद्रन अश्विन , हर्षल पटेल, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, अर्शदीप सिंग पाकिस्तानी संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हॅरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हस्नैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, शान मसूद, फखर जमान

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या